Breaking

Nail loss disease : आमचे रक्त, केस आणि नखं तुम्ही नेता तरी कुठे?

Where do you take our blood, hair and nails? : ग्रामस्थांचा सवाल; आरोग्य यंत्रणेच्या दिरंगाईबद्दल संताप

Khamgao “आधी केस, आता नखं… पुढे काय होणार?” – असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. केसगळतीच्या समस्येने बाधित रुग्णांसह गावकरी त्रस्त आहेत. त्यातच नखगळतीची समस्या सुरू झाली. आयसीएमआरचा अहवाल अद्याप आला नाही. रुग्णांचे रक्त, केस, नखांचे नमुने गोळा करून नेता तरी कुठे ? असा संतप्त सवाल बोंडगावच्या ग्रामस्थांनी पुण्याच्या आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. बबीता कमलापूरकर यांच्यासमोर केला.

शेगाव तालुक्यातील बोंडगाव व आसपासच्या गावांमध्ये आधीच केसगळतीच्या संकटाने गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. आता त्यात नखगळतीची नवी समस्या उभा राहत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पुणे येथून आरोग्य सेवा विभागाच्या सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांच्या नेतृत्वात विशेष पथक सोमवारी (२२ एप्रिल) बोंडगावात दाखल झाले.

Prataprao Jadhav : नख गळतीच्या आजाराने केंद्रीय पथकही बुचकाळ्यात!

डॉ. कमलापूरकर आणि त्यांच्या टीमने बोंडगाव व कठोरा या गावांना भेट देत बाधित रुग्णांशी संवाद साधला. नखं गळण्याची प्रक्रिया, इतर शारीरिक लक्षणं, अन्नपाणी व जीवनशैली याविषयी सखोल माहिती घेतली. त्यांच्यासोबत जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाहेकर आणि आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Dr. Pankaj Bhoyar : जंगलाने वेढलं, सरकारने सोडवलं!

चार महिन्यांपूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) ने बोंडगाव व परिसरातील केस, नखं, अन्नधान्य, पाणी व रक्ताचे नमुने गोळा केले होते. मात्र आजतागायत अहवाल प्राप्त न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे. या अहवालाअभावी केसगळतीच्या कारणांचा उलगडा न होता आता नखगळतीची नवी चिंता उभी राहत आहे, त्यामुळे आरोग्य प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.