Namaz at Shaniwarwada : शनिवार वाडा शुद्धीकरण मोहिमेमुळे महायुतीत फूट !

Shinde-Nationalist Aggressive, Political Scam : शिंदे-राष्ट्रवादी आक्रमक, राजकीय कलगीतुरा

Pune: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात झालेल्या “शुद्धीकरण” मोहिमेमुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत मोठी फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी जाऊन गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याची घटना घडली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी शनिवार वाड्याबाहेरील दर्गा आणि मजार एका आठवड्यात हटवण्याची मागणी करत अल्टिमेटम दिला.

या कृतीनंतर महायुतीतील मित्रपक्षांनी मेधा कुलकर्णींवर थेट निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप करत, “पुण्यात हिंदू-मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने राहत असताना अशा कृतीमुळे तणाव वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपने आपल्या खासदाराला लगाम घालावा आणि त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी केली. त्यांनी सोमवारी सायंकाळी कुलकर्णींविरोधात आंदोलनही केले. अनेकांचे मत आहे की, अल्पसंख्याक मतदारांवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे.

Cyber fraud : मी एनआयएचा अधिकारी बोलतोय, तुमचं नाव दहशतवादी हल्ल्यात !

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही या प्रकरणी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “शनिवार वाडा हे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीतील संरक्षित स्थळ आहे. येथे काय करता येईल आणि काय नाही, याचे स्पष्ट नियम आहेत. जर नियम मोडले गेले असतील तर त्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा आहे. कोणीही आम्हीच सरकार असल्यासारखे वागू नये.”

Reservation controversy : निवडणुकांमध्ये मूळ ओबीसींना फटका बसणार

या घटनेनंतर पुण्यातील राजकारणात कलगी तुरा रंगला आहे. पोलिसांनी संरक्षित स्थळी नमाज अदा करणाऱ्या अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडकीस आले असून, स्थानिक निवडणुकांपूर्वी मित्रपक्षांतील तणाव अधिक वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे.

____