Breaking

Nana Patole : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना लवकरच आला सत्तेचा माज !

Agriculture Minister Manikrao Kokate will soon assume Power : भाजप महायुतीचे सरकारच भिकारी, विमा देऊन उपकार करते काय ?

Mumbai : भारतीय जनता पक्ष महायुतीचे सरकार शेतकरी विरोधी आहे, हे वारंवार उघड झाले आहे. शेतकऱ्याला अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून त्यांचा सातत्याने अपमान केला गेला. आता राज्यातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दलचे विधान त्यांना सत्तेचा माज आल्याचे दर्शवते, असा हल्लाबोल काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केला आहे.

पटोले म्हणाले, शेतकरी भिकारी नाही. तर शेतक-यांसह सर्वसामान्य जनतेला जीएसटीच्या माध्यमातून लुटणारे भाजपा युती सरकारच भिकारी आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानाचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याचा अपमान करणे ही विकृती आहे. भाजपा युती सरकार हे शेतकरी विरोधी आहे. फक्त धनदांडग्यांसाठी काम करत आहे.

Ashish Shelar : सुरेश धस – धनंजय मुंडे भेटीवर आशिष शेलार म्हणाले..

सरकार एक रुपयात पीक विमा देते म्हणजे शेतकऱ्यांवर उपकार करत नाही. हे पैसे माणिकराव कोकाटे त्यांच्या खिशातून देत नाहीत. सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देत नाही, कर्जमाफी देत नाही. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना भरमसाठ आश्वासने देऊन भाजपा युतीने मतांची भिक मागितली. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून सरकार शेतकऱ्यांकडूनच भिक घेते आणि वरून शेतकऱ्यांनाच भिकारी म्हणते.

Bahujan samaj party : बसपाच्या केंद्रीय प्रभाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांना थेटबोल!

शेतकऱ्यांच्या नावावर विविध योजनांमध्ये कृषी मंत्रालय कशी मलाई खाते याचा पर्दाफाश नुकताच आम्ही केला आहे. पीक विमा योजनेतही भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करावी, असेही नाना पटोले म्हणाले.