Breaking

Nana Patole : भाजप सत्तेत असतानाच महापुरुषांचा अवमान

 

BJP insults great Personalities when in Power : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंची घणाघाती टीका

Mumbai भारतीय जनता पक्ष निवडणुकीत मतांसाठी महापुरुषांचा वापर करते. सत्तेत आल्यानंतर त्यांचा अवमान करते. हे गेल्या काही वर्षांपासून सारेच अनुभवत आहेत. भाजपाचे डझनभर नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला. तसेच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही अवमान केला. भाजप सत्तेत असतानाच असे प्रकार होत असतात, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

नवी दिल्ली येथे पटोले माध्यमांसोबत बोलत होते. राहुल सोलापूरकर यांच्या विषयावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. अभिनेता राहुल सोलापूरकर जाणीवपूर्वक महापुरुषांचा अवमान करत आहे. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मागील आठवड्यातच अपशब्द वापरून सोलापूरकर याने अवमान केला. त्यानंतर त्याने माफी मागितली. आता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राहुल सोलापूराने गरळ ओकली आहे आणि माफी मागण्याचे नाटकही केले, असं पटोले म्हणाले.

Farmer Suicide : गोंदियात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या!

राहुल सोलापूरकर याच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी. जेणेकरून पुन्हा कोणी महापुरुषांचा अपमान करण्याची हिंमत करणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

परभणी व बीड प्रकरणी पोलिसांच्या मदतीने लोकांचे जीव घेतले गेले. परभणीतील आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांच्या मारहणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सरकारने अजून त्या पोलिसांवर कठोर कारवाई केलेली नाही. संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीत कोंबिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. या कोंबिंग ऑपरेशनचे आदेश कोणी दिले? मंत्रालय व पोलीस महासंचालक कार्यालयातून आदेश दिले गेले का? असा सवालही पटोले यांनी केला.

NCP Sharad Pawar : शरद पवार गटापुढे संघटन मजबूत करण्याचे आव्हान

सोमनाथ सुर्यवंशी या निरपराध सुशिक्षित तरुणाचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळेच झाला. हे सिद्ध झालेले आहे. तरीही राज्य सरकार अद्याप संबंधित पोलिसांना पाठीशी घालत आले आहे. सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाला अशी खोटी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात दिली, असा आरोपही त्यांनी केला.