Congress and Shiv Sena trying to save the District Milk Association from NCP’s Praful Patel : भाजप श्रीमंत होत चाललाय, अन् जनता गरीब
Nagpur : शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सहकारच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा हात धरला. काँग्रेससोबत नरेंद्र भोंडेकर सहकारच्या निवडणुका लढवणार असल्यावरून भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील राजकारण पेटले आहे. काँग्रेससोबत युती केल्याची कबुली आमदार भोंडेकर यांनी यापूर्वीच दिली, अन् आता नाना पटोले यांनीही या युतीमागचे कारण सांगितले आहे.
नागपुरात आज (ता. २० जून) पत्रकार परिषेदेत नाना पटोले यांनी सांगितले की, जिल्हा दुध संघाला प्रफुल पटेले यांच्यापासून वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहो. त्यासाठी आम्ही आमदार नरेंद्र भोंडेकर यांना सोबत घेतले आहे. हा संघ वाचवण्यासाठी आम्ही सर्व जण एकत्र आलो आहोत. पटेल यांच्याकडे जिल्हा दुध संघ जाणे, म्हणजे भाजपकडे जाणे आणि हे जिल्ह्यातील अनेक लोकांना मान्य नाही. त्यामुळे आम्ही सर्व जण एकवटलो आहोत.
Nana Patole : फक्त सहा महिने झाले, सपकाळांना थोडं काम करू द्या !
सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारले असता, घोटाळेबाज स्वतःला वाचवण्यासाठी इकडून तिकडे जाणारच आहेत. पण नाशिकमध्ये सलीम कुत्ताच्या मांडीला मांडी लाऊन बसणाऱ्याला भाजपने पक्षात घेतले, यावरून त्यांनी राजकारणात किती खालची पातळी गाठली, हे लक्षात येते. २६-११ च्या हल्ल्याच्या वेळी आम्ही राज्याच्या तत्कालिन गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला होता. आता पहलगाममध्ये आतंकवादी हल्ला झाल्याची जबाबादारी घेऊन देशाचे गृहमंत्री राजीनामा का देत नाहीत, असा सवाल नाना पटोले यांनी केला.
Uddhav Thackeray : ‘त्या’ मंत्र्याला भर रस्त्यात चाबकाने फोडला पाहिजे !
नाना प्रकारचे घोटाळे करून भाजप गेल्या ११ वर्षांत आर्थिक दृष्ट्या मजबूत झाला आहे. तर दुसरीकडे देशातील जनता गरीब होत चालली आहे. महागाई प्रचंड वाढल्याने लोक अडचणीत आले आहेत. सर्वत्र मॅच फिक्सींग सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची फिक्सींग आहे. त्यासाठी मोठमोठ्या हॉटेलांमध्ये बैठका सुरू आहेत. मूळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी या चर्चा घडवल्या जात आहेत. राज्यभर हा खेळ सुरू असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला.