व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Baramati by-polls : बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्ये ‘गृहयुद्ध’; नाना पटोलेंचा लढण्यास विरोध, तर...

Baramati by-polls : बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्ये ‘गृहयुद्ध’; नाना पटोलेंचा लढण्यास विरोध, तर सपकाळ-वडेट्टीवार ठाम!

nana patole disagree with the congress decision on Baramati by polls: महाविकास आघाडीतील धुसफूस आता चव्हाट्यावर, पाटोलेनी दिले भूतकाळातील दाखले

 

Nagpur उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीतील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केलेले असतानाच, आता काँग्रेसमध्ये या मुद्द्यावरून दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असताना, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र निवडणूक लढवण्यास स्पष्ट विरोध दर्शवला आहे.नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडली.

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि परंपरेचे पालन व्हावे, अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी निवडणूक लढवण्याबाबत जे विधान केले आहे, त्याबद्दल मला पक्की माहिती नाही, मी गावाकडे होतो. पक्षाने नेमका काय विचार करून हा निर्णय घेतला किंवा पक्षश्रेष्ठींनी काय सूचना दिल्या, हे मला अद्याप ठाऊक नाही, असे पटोले यांनी नमूद केले.

Akash Fundkar : फुंडकरांचा अकोल्यात ‘जनता दरबार’, खामगावात का नाही?

भूतकाळातील दाखले देत पटोले पुढे म्हणाले की, आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर भाजपने, तर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर काँग्रेसने उमेदवार उभा केला नव्हता. दुर्दैवाने नंतरच्या काळात भाजपने या परंपरेचे पालन केले नाही, हेही तितकेच सत्य आहे. मात्र, काँग्रेसने नेहमीच अशा प्रसंगी सामंजस्याची भूमिका घेतली आहे आणि हीच भूमिका पक्ष कायम ठेवेल अशी मला आशा आहे.” सर्वात आधी खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नसल्याचे जाहीर केले होते.

Kerala Assembly elections : दटके, सोले, फुके, व्यास डाव्यांच्या बालेकिल्ल्यात; दक्षिण दिग्विजयासाठी भाजपचा ‘नागपूर पॅटर्न’!

मात्र, विजय वडेट्टीवार यांनी ती सुप्रिया सुळेंची वैयक्तिक भूमिका असू शकते, महाविकास आघाडीचा तो निर्णय नाही, असे म्हणत काँग्रेस लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही लढण्याची तयारी दर्शवल्याने काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.एकीकडे सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा मागितला असताना आणि शरद पवार गटाने मवाळ भूमिका घेतली असताना, काँग्रेसच्या या पवित्र्यामुळे महाविकास आघाडीत मोठी फाटाफूट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

error: Content is protected !!