Nana patole claims of operation lotus in coming eight days in Maharashtra: पाच राज्यांच्या निवडणूक निकालांपूर्वीच ‘ऑपरेशन लोटस’ पूर्णत्वास जाणार, काँग्रेस नेत्याची भाजपवर टीका
Nagpur “भाजपचा आजवरचा इतिहास पाहिला तर त्यांनी नेहमीच आपल्या मित्रपक्षांना संपवण्याचे काम केले आहे. आताही भाजप आपल्याच मित्रपक्षांवर डाव टाकत असून, आगामी आठ दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळेल,” असा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. पाच राज्यांच्या निवडणूक निकालांपूर्वीच ‘ऑपरेशन लोटस’ पूर्णत्वास जाणार असल्याचा दावा करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
काही दिवसांपूर्वी माजी खासदार नवनीत राणा यांनी शिंदे गट, ठाकरे गट आणि अजित पवार गटाचे अनेक आमदार-खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना पटोले म्हणाले की, भाजप हा इतरांना गिळंकृत करणारा पक्ष आहे. देशभरातील भाजपच्या मित्रपक्षांची आज काय अवस्था झाली आहे, यावर नजर टाकल्यास शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भवितव्य अंधारात दिसते. त्यांचे नेते भाजपमध्ये सामील झाले तर नवल वाटण्याचे कारण नाही. याची सुरुवात झाली असून, येणाऱ्या काळात राज्यात केवळ भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष शिल्लक राहतील.
Ashok kharat case : आधी बापाचे कारनामे उघडकीस, आता मुलगाही फरार
भाजप हा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा ‘गेम’ करणार हे मी आधीच सांगितले होते, आता मोठा खेळ शिल्लक आहे; फक्त आठ दिवस थांबा, सर्व चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्राची जनता या राजकारणाला कंटाळली असून त्यांना पुन्हा सत्तेत काँग्रेस हवी आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, सरकारने बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यास जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देईल, असे आव्हानही त्यांनी दिले.
Sunetra pawar – बारामतीत महासंग्राम,१९ उमेदवारांविरोधात सुनेत्रा पवारांची खरी कसोटी
यावेळी नाना पटोले यांनी भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्य सरकार आणि विशेषतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले.अशोक खरात हा सत्ताधाऱ्यांनीच पोसलेला बाबा असून त्याच्या आश्रमात बड्या नेत्यांची आणि व्हीआयपींची मोठी उठबस असायची. इतकी मोठी हालचाल सुरू असताना गृहमंत्रालयाला याची खबर नव्हती, हे पटण्यासारखे नाही. सरकारनेच त्याला आजवर पाठीशी घातले असून, आता हे प्रकरण अंगलट आल्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे,” असे सांगत पटोले यांनी थेट गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.








