Nana Patole : ‘त्या’ भ्रष्टाचारी ओएसडी आणि पीएंची नावं जाहिर करा!

Reveal the names of ‘those’ corrupt OSDs and PAs : रेती तस्करी आणि भ्रष्टाचारावरून नाना पटोले आक्रमक

Mumbai : मंत्र्यांचे ओएसडी आणि पीए भ्रष्टाचारी असतील, तर त्यांची नियुक्ती केली जाणार नाही, असा फतवाच मुख्यमंत्र्यांनी काढला. या नियुक्त्यांचे सर्व अधिकार त्यांनी स्वतःकडे ठेवले. मागील सरकारमध्ये कोण होते ते भ्रष्टाचारी ओएसडी आणि पीए, त्यांची नावं जाहिर करा, असे आवाहन पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना केले.

यासंदर्भात आज (१० मार्च) सभागृहात बोलताना नाना पटोले म्हणाले, सरकार भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायला निघाले आहे. पण सत्ताधाऱ्यांच्या कृतीतून तसे दिसून येत नाही. रेती तस्करीवरून त्यांनी सरकारला चांगलेच सुनावले. ते म्हणाले, भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील वरठी रेतीच्या टिप्परच्या धडकेत एका मुलीचा मृत्यू झाला, तर तिचे वडील गंभीर जखमी झाले.

Nagpur Municipal Corporation : महापालिका उदार झाली, लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

दुसऱ्या एका घटनेत १२ वर्षाचा मुलाग गंभीर जखमी झाला. त्याला एक हात गमावावा लागला. सासंदर्भात एका सत्ताधारी आमदारानेच सरकारला पत्र दिले आहे. तरीही त्यावर कारवाई झालेली नाही. जिवगेणी रेती तस्करी थांबणार आहे की नाही, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. पुर्वी माफियांमध्ये संघर्ष उडत होता. त्यातून पुढे गुन्हेगारी वाढली. पण आता ही तस्करी निष्पाप, सामान्य लोकांच्या जिवावर उठली आहे. तरीही सरकार ढिम्मच आहे, असाही आरोप त्यांनी केला.

पोलिस, महसूल विभाग सहभागी..
मोटरसायकलचा जिओ टॅग लाऊन मध्यप्रदेशातून रेतीची तस्करी केली जाते. भंडारा जिल्ह्यातच रेती भरून त्यानंतर ट्रक नागपूरला रवाना होतात. एकीकडे गरीबांच्या घरकुलासाठी रेती मिळत नाही. दुसरीकडे माफियांचे साम्राज्य वाढत आहे. काय चाललंय या महाराष्ट्रात? पोलिस आणि महसूल विभागही यात सहभागी आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.

Sanjay Raut-Vijay Wadettiwar : राऊत म्हणाले, धंगेकर सत्तेच्या वळचणीला लागले!

बीडची घटनाही रेती तस्करीतूनच..
ज्या पद्धतीने रेती माफियांनी सामान्य लोकांचे जगणे मुश्कील केले आहे. त्यावरून हा गुन्हेगारांचा महाराष्ट्र आहे, असेच म्हणता येईल. बीडमधील ज्या घटनेने आजही महाराष्ट्र हादरलेला आहे, ती घटनासुद्धा रेतीच्या तस्करीतूनच घडलेली आहे. सरकारने निवेदन करावे. यावर चर्चा व्हावी अशी इच्छा होती. पण बजेट असल्यामुळे आज आग्रह करत नाही, असेही पटोले म्हणाले. पण रेतीमाफियाचा बंदोबस्त करावा. फक्त भंडाऱ्यातच नाही तर महाराष्ट्रभर ही कारवाई करावी, असेही ते म्हणाले.