Nana Patole : छगन भुजबळांनी नौटंकी बंद करावी !

Chhagan Bhujbal Urged to End the Drama : भाडणं लाऊन महाराष्ट्र विकला जात आहे

Nagpur : जाती-जातींमध्ये भांडणं लाऊन महाराष्ट्र विकला जातो आहे. स्कॉलरशीप दिली जात नाही. छगन भुजबळ यांनी आता नौटंकी बंद करावी. जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा काय निर्णय घ्यायचा, हे भुजबळ यांनी ठरवावे. दिशाभूल करून त्यांनी ओबीसी नेत्यांना वेगळ्याने कामी लावले आहे. सरकार सामाजिक समतोल बिघडवण्याचे काम करत आहे. ह्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत, अशी टीका काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी केली.

नागपुरात आज (१८ सप्टेंबर) पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी नवीन मद्य विक्री धोरणावरही टीका केली. ते म्हणाले, मद्य परवाने आधीच वाटून झाले आहेत. दारूतून पैसे कमवण्याचे काम सरकार करत आहे. हे राज्य नशेडी करून त्यांना तरुणांना संपवायचे आहे. नवीन परवाने दिले पण आता निवडणुका तोंडावर असल्याने ते रद्द केले. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत विचारले असता, त्यांचे मनोमिलन होत आहे, त्यावर बोलण्याची गरज नाही. ते महाविकास आघाडीत असणार की नसणार, यावर आत्ताच बोलणं योग्य होणार नाही. याबाबत हायकमांड निर्णय घेईल.

Narendra Modi : पंचाहत्तरीनंतर मी थांबलो नाही मोदींना कसे थांबा म्हणणार !

तरुणांना अग्नीवीर करून २२व्या वर्षी निवृत्त केले जात आहे. यावर काय करायचे ते आता जनतेनेच ठरवायचे आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना वयाची ७५ वर्षे झाल्यावर बाजुला केले. आता त्यांचा काय निर्णय होतो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांच्या विचारांनी लढल्या जाणार आहेत. ही कार्यकर्त्यांची निवडणुूक आहे. या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या कुठल्याही बोलण्याला विरोध नाही, असे पटोले म्हणाले.

Nana Patole : मत चोरीवर आता लोकांनीच जागरूक व्हावे !

स्व. मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या घटनेचा आम्ही निषेध करतो. बिहारमध्ये नरेंद्र मोदींच्या आईबद्दल अपशब्द बोलणारा भाजपच्याच आयटी सेलचा माणूस होता. अशा घटना घडणे म्हणजे सरकारचे अपयश आहे. सरकार विषयांना बगल देत आहे. राज्यावर आभाळ फाटले आहे. एकीकडे शेतकऱ्यांना मदत करायला सरकारकडे पैसे नाहीत. पण कर्ज घेऊन हायवे बांधले जात आहेत. आता सरकारने पंचनाम्याची वाट बघू नये. तर सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.