Breaking

Narendra Bhondekar : विधानभवनातील ‘ती’ हाणामारी घातपात करण्याच्या उद्देशाने तर नव्हती !

Notice to NCP MLA Jitendra Awhad and Gopichand Padalkar : दोन्ही आमदारांना नोटीस, १५ दिवसांत म्हणणे मांडावे लागणार

Nagpur : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या पहिल्या माळ्यावर तुफान हाणामारी झाली. तेथे उपस्थित सुरक्षा रक्षकांनी भांडण सोडवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही हाणामारी हेतुपुरस्सर किंवा मोठा घातपात घडवण्याच्या उद्देशाने तर नव्हती, अशी शंका शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपस्थित केली आहे.

जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या भांडणाबाबत भोंडेकर यांनी आज (५ ऑगस्ट) नागपुरात पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पावसाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी झालेली शिवीगाळ आणि मारहाण याची विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली आहे. विधानभवनाच्या हक्क भंग समितीची उद्या बैठक आहे आणि हे प्रकरण हक्क भंग समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. मागच्या आठवड्यातच आमच्या समितीकडे हे प्रकरण आले आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचे प्रयत्न यशस्वी, शेतकऱ्यांना पिक विमा नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज !

या प्रकरणात दोन्ही आमदारांचे काय म्हणणे आहे, यासाठी त्यांना १५ दिवसांची नोटीस देण्यात आली आहे. या कालावधीत त्यांना त्यांचे म्हणणे मांडायचे आहे. या प्रकरणात काही लोकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. शेवटी २८८ आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे उद्या मुंबई पोलिस आयुक्तांनादेखील बोलावण्यात आले आहे. काही लोकांवर क्रिमिनल केसेस असल्याचीही माहिती आम्हाला मिळत आहे. त्यामुळे या घटनेची पार्श्वभूमी काय, हे तपासण्याची गरज आहे.

Bhartiya Seva Sadan : बनावट मृत्युपत्राच्या आधारे ३० एकर जमीन हडपली

ही हाणामारी हेतू पुरस्सर किंवा मोठा घातपात घडवण्याच्या उद्देशाने तर करण्यात आली नव्हती, याचा तपास केला जाणार आहे. दोन आमदारांतील आपसातला वाद असल्याने समिती त्यांना संधी देते की नाही, हे बघावे लागणार आहे. फक्त औपचारिकता म्हणून नोटीस दिली आहे का, हेसुद्धा लवकरच कळणार आहे. दोन्ही आमदारांना १५ दिवसांची नोटीस दिल्याने ते उद्याच्या (६ ऑगस्ट) बैठकीत उपस्थित राहणार नाहीत, असेही आमदार भोंडेकर यांनी सांगितले.