Breaking

Narendra Modi : देशातील गरिबांना चांगला उपचार मिळावा, हीच सरकारची नीती !

 

Prime Minister Narendra Modi explained the importance of Ayushman Bharat Yojana : आधुनिक विज्ञानासोत जुळलेले लोक देशाला प्रगतीपथावर नेत आहेत

Nagpur : आजवर देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केलेल्या देशातील ज्येष्ठ नागरिकांना उपचाराची चिंता वाटू नये. गरीबातील गरीबाला चांगल्यात चांगला उपचार मिळावा, ही सरकारची निती आहे. त्यामुळे आपण आयुष्यमान भारत ही योजना आणली. आयुष्यमान भारतमुळे आज कोट्यवधी लोकांना मोफत उपचार मिळत आहेत. हजारो जनऔषधी केंद्र गरिबांना, मध्यमवर्गीयांनी स्वस्त दरात औषधी देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधानांच्या हस्ते आज (३० मार्च) नागपुरातील माधव नेत्रालयाचे उद्घाटन झाले. यावेळी ते म्हणाले, गरीबांसाठी हजारो डायलीसीस केंद्र चालवले जात आहेत. हे केंद्र मोफत डायलीसीस करत रुग्ण सेवेचा यज्ञ चालवत आहेत. देशातील लोकांचे हजारो कोटी रुपये वाचत आहेत. त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळत आहे. गेल्या १० वर्षांत लाखो आयुष्यमान आरोग्य मंदीर बनले. चांगल्या डॉक्टरांकडून लोकांना उपचार मिळत आहेत, हे या योजनेचे यश आहे.

Narendra Modi : पवित्र यज्ञात पुण्य संकल्पाच्या विस्ताराचे साक्षीदार होता आले !

उपचारासाठी आता लोकांना शेकडो किलोमिटरचे अंतर पार करून जावे लागत नाही. सरकारने मेडीकल कॉलेज दुपटीने वाढवले. मेडिकलच्या सीट दुप्पट केल्या. येत्या काळात लोकांच्या सेवेसाठी जास्तीत जास्त डॉक्टर्स आणि चांगले डॉक्टर्स उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी आम्ही साहसी निर्णय घेतला. गरीबांचे मुलंही डॉक्टर बनले पाहिजे, यासाठी विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण घेण्याची सुविधा दिली. आधुनिक विज्ञानासोत जुळलेले लोक देशाला प्रगतीपथावर नेत आहेत. योग, आयुर्वेदालाही आज जगभरात नवी ओळख मिळाली आहे. परिणामी जगभरात भारताचा सन्मान वाढत असल्याचे मोदी म्हणाले.

Narendra Modi’s Nagpur Tour : पंतप्रधानांच्या कार्यक्रमात पोहोचण्यासाठी मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या !

आरोग्य सेवेमध्ये अजून भरीव कार्य करायचे आहे. आपल्या देशातील युवा त्यासाठी हातभार लावत आहे. प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यामध्ये याची प्रचिती आली. सेवेसाठी लाखो युवांचे हात सरसावले होते. त्यांच्यासाठी चांगल्याच चांगले शिक्षण उपलब्ध करून त्यांना देशसेवेची संधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.