Narendra Modi : संघाची तपस्या लिहीत आहे विकसीत भारताचा नवा अध्याय !

Prime Minister Narendra Modi said that the RSS is writing a new chapter for a developed India : विश्वबंधुत्वाची भावना आपल्या संस्कारांचाच विस्तार

Nagpur : भारत देश आज गुलामीची मानसीकता तोडून पुढे जात आहे. राष्ट्रीय गौरवाचे नवेनवे अध्याय लिहिले जात आहेत. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठी तपस्या केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. इंग्रजांनी भारतीय लोकांना तृच्छ लेखण्यासाठी कायदे बनवले होते. आपल्या देशाने ते बदलवले आणि दंड संहितेच्या जागी आता भारतीय न्याय संहिता लागू झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या हस्ते आज (३० मार्च) नागपुरात माधव नेत्रालयाचे उद्घाटन झाले. यावेळी ते म्हणाले, आता राजपथ नाही, तर कर्तव्यपथ आहे. नौसेनेच्या ध्वजावर पूर्वी गुलामीचे चिन्ह होते. आता नौसेनेच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक आहे. अंदमान द्विपवर सावरकरांनी देशासाठी यातना सहन केल्या होत्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी बिगूल फुंकले होते. आज त्या द्विपांना आझादीच्या नायकांचे नाव दिले आहे.

Narendra Modi : गुरूजी म्हणाले होते, संघ म्हणजे प्रकाश!

‘वसुधैव कुंटुंबकम’, जगाच्या कोपऱ्यात पोहोचत आहे. जग आपल्या कार्यात हे सर्व बघत आहे. कोविडमध्ये भारताने संपूर्ण विश्वाला आपला परिवार मानून व्हॅक्सीन उपलब्ध करून दिले होते. भारत मनापासून सेवेसाठी तयार असतो. म्यानमारमध्ये भुकंप आला. भारत ऑपरेशन ब्रम्हामार्फत त्या लोकांच्या मदतीसाठी पहिले पोहोचला. तुर्कीमध्ये भुकंप, नेपाळमध्ये भुकंप झाला, तेव्हा भारताने मदत करण्यात क्षणभरही विलंब नाही केला. युद्धाच्या काळातही दुसऱ्या देशातील लोकांना सुरक्षित काढून आणल्याचेही मोदी मोदी म्हणाले.

भारत प्रगती करत आहे. ग्लोबल आवाज बनत आहे. विश्वबंधुत्वाची भावना आपल्या संस्कारांचाच विस्तार आहे. देशाची मोठी पुंजी म्हणजे आपला युवा आहे. हा युवा विश्वासू आहे. त्याची रिस्क टेकींग कॅपेसीटी वाढली आहे. नवनवे शोध केले जात आहेत. स्टार्टअप्सच्या युगात अटकेपार झेंडे गाडत आहे. आजच्या भारताचा युवा यशाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

PM Narendra Modi : माधव नेत्रालय म्हणजे आध्यात्म, ज्ञान आणि गौरव गुरुतेचे अदभूत विद्यालय !

प्रयागराजमध्ये युवा पिढी लाखो करोडोच्या संख्येने आली. सनातन परंपरेशी जुळली आणि गौरव वाटून घेतला. देशाच्या गरजा समजून ते काम करत आहेत. मेक इन इंडिया युवांनीच यशस्वी बनवला. आजचा युवा लोकलसाठी वोकल झाला आहे. देशासाठी जगायचे आहे. देशासाठी काही करायचे आहे. खेळाच्या मैदानापासून अंतरीक्षापर्यंत राष्ट्रभावनेने ओतप्रोत युवक पुढे जात आहेत. १९४७ला आझादीच्या १००व्या वर्षात ते विकासाचा ध्वज नक्कीच उंचावतील, असे मोदी म्हणाले.

Narendra Modi : देशातील गरिबांना चांगला उपचार मिळावा, हीच सरकारची नीती !

संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिसुत्री भारताला ऊर्जा आणि नवी दिशा देत राहील. संघाचे इतक्या वर्षाचे परिश्रम फळास येत आहेत. तपस्या विकसीत करून भारताचा नवा अध्याय लिहीला जात आहे. संघाची स्थापना झाली, तेव्हा भारताची स्थिती वेगळी होती. १९२५ पासून १९४७ पर्यंत संघर्षाचा काळ होता. आझादीचे लक्ष्य होते. १०० वर्षाच्या यात्रेनंतर देश मुख्य वळणावर आला आहे. आता २०२५ पासून २०४७ पर्यंत या महत्वपूर्ण काळात पुन्हा एकदा मोठे लक्ष्य आपल्यासमोर असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.