Sharad Pawar expressed sentiments bitterness not, harmony should increase : कटुता वाढू नये, सुसंवाद वाढावा शरद पवारांनी व्यक्त केली भावना
Kolhapur : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बुधवारी 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आज बोलताना म्हणाले की, “राजकारणात अशा प्रसंगी कटुता ठेवू नये. यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारानुसार आम्ही वागणारी माणसं आहोत.”
नरेंद्र मोदींना अवतारपुरुष म्हणण्यावर त्यांनी शंका व्यक्त केली. “माझ्या 75 व्या वाढदिवसाला मोदी स्वतः आले होते. त्यांनी राजकारण आणलं नाही, आम्हीही आणत नाही,” असे ते म्हणाले. पुढे पवारांनी मिश्कील भाषेत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत सांगितले “मी थांबलो नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींना पंचाहत्तरीनंतर थांबा, असं म्हणू शकत नाही. पंचाहत्तरीनंतर थांबू असे बोललोच नव्हतो असं काही लोक म्हणतायत.”
शेतकऱ्यांच्या नुकसानीवर बोलताना पवार म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीन उद्ध्वस्त झालं, जमिनी वाहून गेल्या. सरकार पंचनामे कधी करतंय, मदत कधी पोहोचतेय, हे बघणं गरजेचं आहे. देवाभाऊंनी पंचनामे आणि मदतीकडे लक्ष द्यावं.”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, मविआची युती सर्वत्र होईलच असं नाही. “स्थानिक समीकरणं बघून निर्णय घेऊ. काही ठिकाणी एकत्र लढू, काही ठिकाणी स्वतंत्र,” असं ते म्हणाले. ठाकरे बंधूंबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “ते एकत्र आले तर ताकद वाढेल. मुंबई-ठाण्यात त्यांची ताकद आहे. जास्त जागा मागण्यात गैर नाही.”
मराठा-ओबीसी प्रश्नावर त्यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “दोन्ही समित्यांत एकाच जातीचे सदस्य का? ऐक्य हवं असेल तर समित्यांत विविध समाजाचे प्रतिनिधी असायला हवेत,” असा सल्ला त्यांनी दिला.
निवडणूक आयोगावर टीका करत पवार म्हणाले, “300 खासदारांनी प्रथमच आयोगावर मोर्चा काढला. ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही. आयोगानं आपली विश्वासार्हता वाढवावी. राहुल गांधींच्या आरोपानंतरही आयोग खबरदारी घेताना दिसत नाही. त्यांच्या हायड्रोजन बॉम्बची मीही वाट बघतोय.”
Sudhir Mungantiwar : “सुधीरभाऊ मी आणि आरपीआय कायम तुमच्या सोबत”
“कटुता वाढू नये, सुसंवाद वाढावा, आणि शाहू महाराजांचा व्यापक हेतू आजही कायम ठेवायला हवा,” असं मत व्यक्त करत शरद पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भूमिका मांडली.