Narhari Zirwal : झिरवळ प्रकरणाचा ‘पेनड्राइव्ह’ समोर आला तर ३ मंत्र्यांच्या विकेट पडतील

three ministers will lose posts if narhari zirwal case pen drive outs : राजकीय स्पर्धेतून झिरवळांचा ‘गेम’, काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Nagpur महायुती सरकारमधील मंत्री सध्या एकमेकांवर टपून बसले असून, कोण कोणाची विकेट कधी काढेल याचा नेम उरलेला नाही. प्रत्येकाला एकमेकांची जागा रिकामी करून हवी आहे आणि त्यातूनच मोठी स्पर्धा सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा ‘गेम’ देखील याच स्पर्धेतून झाला आहे, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यामागे एका माजी मंत्र्याचा हात असल्याचे सांगत, त्यांनी नाव न घेता सूचक इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

झिरवळ यांच्या व्हायरल क्लिपबाबत भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, या प्रकरणाचा संपूर्ण पेनड्राइव्ह जर समोर आला, तर किमान तीन मंत्र्यांच्या विकेट पडतील. त्यामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाच्या व्हिडिओ क्लिप आहेत. सध्या केवळ सोयीचा असेल तेवढाच भाग समोर आणला जात असून मोठ्या माशांना वाचवण्यासाठी पूर्ण क्लिप दाबल्या जात आहेत.

Eknath Shinde Shivsena : दिल्ली बैठकीनंतर जिल्ह्यात खळबळ; गटबाजी, नाराजी आणि सूचक हालचाली

भोंदू बाबा अशोक खरात याच्या संदर्भात बोलताना त्यांनी रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याचा उल्लेख केला. खरातचे पाय धुणाऱ्या आणि त्याच्या डोक्यावर छत्र धरणाऱ्या फोटोंमुळे महिला आयोग अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, पेन ड्राइव्हमधील इतर प्रकार त्यापेक्षाही धक्कादायक आहेत, असे ते म्हणाले. झिरवळ यांचा व्हिडिओ शासकीय वसतिगृहातील असल्याचे दिसून येते, जर पदावर असताना अशा वास्तूचा चुकीचा वापर झाला असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आणि अयोग्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Buldhana Politics : ‘३५ कोटी’वरून बुलढाण्यात राजकारण पेटले; गायकवाड-सपकाळ आमनेसामने

तंत्र-मंत्राच्या विषयावर टोला लगावताना वडेट्टीवार म्हणाले की, अशोक खरात हा तंत्र-मंत्र करायचा आणि राज्यातील अनेक बडे नेते, मंत्री खुर्ची मिळवण्यासाठी किंवा एकमेकांचा काटा काढण्यासाठी त्याच्याकडे जायचे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांनीही असा प्रयत्न केला असावा, मात्र त्याची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. खरातकडे जाणारे व्हीआयपी पाहता, त्याचा ‘एन्काऊंटर’ होण्याची भीती वाटते.

पुरावे नष्ट करून त्याच्या जवळच्या बड्या लोकांना वाचवण्यासाठी हे प्रयत्न सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी, खरातला फाशीची शिक्षा व्हावी पण ती कायद्यानुसार व्हावी. सरकारमधील काही लोकांच्या सांगण्यावरून त्याला मारून टाकण्याची भिडे गुरुजींची इच्छा दिसते, असा बोचरा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.