व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Nashik crime news : फिर्यादीच निघाला आरोपी, नोकरीच्या आमिषाने महिलांचे शोषण

Nashik crime news : फिर्यादीच निघाला आरोपी, नोकरीच्या आमिषाने महिलांचे शोषण

nashik-satpur-crime-video-scam-87-clips-women-exploitation-case : नाशिक सातपूरमध्ये धक्कादायक ‘व्हिडीओकांड’, स्वतःच दिली होती खंडणीची तक्रार

Nashik : नाशिक शहरातील सातपूर परिसरात फिर्यादीच आरोपी ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नोकरीचे आमिष दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा आरोप असलेल्या रवींद्र गणपत एरंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, याच व्यक्तीने काही दिवसांपूर्वी स्वतःवर १२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती.

सातपूर पोलिसांनी खंडणी प्रकरणात चार संशयितांना अटक केल्यानंतर तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघडकीस आली. एरंडे याच्या टॅबची तपासणी करताना तब्बल ८७ अश्लील व्हिडीओ सापडले. याशिवाय त्याच्याकडून चार मोबाईल फोन, दोन पेनड्राईव्ह आणि एक मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहे. या इलेक्ट्रॉनिक साधनांमधील माहितीच्या आधारे पोलिस तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

Car accident : भरधाव कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याशी जवळीक साधली आणि नंतर त्यांच्या नकळत अथवा दबावाखाली अश्लील व्हिडीओ चित्रीत केल्याचा संशय आहे. नाशिक तसेच इगतपुरी परिसरातील हॉटेलमध्ये या प्रकारच्या घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या व्हिडीओंचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी करण्यात आला का, तसेच त्यांची विक्री ‘ब्लू फिल्म’ स्वरूपात करण्यात आली का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणातील पीडितांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, खासगी कंपनीतील कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर एरंडे याच्यावर बलात्कार आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Unseasonal rain : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर कायम; पुढील ४८ तास धोक्याचे

दरम्यान, १२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद देणारा एरंडे स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्ती, ठिकाणे आणि संभाव्य रॅकेटचा सखोल तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!