Breaking

Nasik Politics : पालकमंत्रिपदाच्या वादात मला पडायचे नाही !

NCP Minister Chhagan Bhujbal says he doesn’t want to get involved in the controversy over the guardian ministership of Nasik : मंत्री असलो काय अन् नसलो काय, नाशिकसाठी सदैव काम करत असतो

Nagpur : माझा जन्म नाशीकला झाला आहे. मी नाशिकचा आहे. त्यामुळे मंत्री असलो काय अन् नसलो काय, नाशीसाठी मी सदैव काम करत असतो. नाशिकचे जे कुणी कारभारी होतील, त्यांना पूर्ण सहकार्य करेन. माझ्या आणि जनतेच्या सुचनाही त्यांना सांगेन. पण नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या वादात मला पडायचे नाही, असे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

एका विवाह समारंभासाठी भुजबळ आज (२३ मे) नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, अजित दादांनी आधीच सांगितले आहे की, असं काही नाहीये. फक्त माध्यमांमध्येच हा विषय सुरू आहे. प्रत्यक्षात काहीही नाही. नाशिकचे पालकमंत्रिपद आमच्याकडे राहावे, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यावर माझा काहीच विरोध नाही. मी सुचना केल्यावर बावनकुळे किंवा मुख्यमंत्री लगेच कार्यवाही करतात.

Maharashtra Politics : पहिल्या मंत्रिमंडळाच्या वेळीच फडणवीसांनी आग्रह धरला होता !

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईवर दावा केला आहे, असे विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितले आहे की, मुंबई महापालिका आम्ही तीन पक्ष मिळून लढणार आहोत. काही ठिकाणी अपवाद राहू शकतो, असे मंत्री भुजबळ म्हणाले. चित्रा वाघ यांनी हगवणे कुटुंबाच्या संदर्भात ट्विट केले आहे. त्यावर जनतेच्या भावना अशा उचंबळून येतात. कठोर कारवाईची मागणी सगळेच करत आहेत. त्यासंदर्भात न्यायालय ठरवेल, असे मंत्री भुजबळ म्हणाले.

NCP Ajit Pawar : विदर्भातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कसली कंबर!

कुणबी प्रमाणपत्रांच्या संदर्भात नियम आणि कायद्यांप्रमाणे वागले पाहिजे, ते सोडून कुणी वागत असेल तर कारवाई होईल. धनंजय मुंडे यांची नाराजी आहे. पण कुणी मंत्री झाला आणि कुणाला राजीनामा द्यावा लागला की तो नाराज होणारच. कारण हा मनुष्य स्वभाव आहे. मी कोणत्याही विशिष्ट खात्याची मागणी केलेली नाही. पण मला असं कळलं की अन्न पुरवठा खातं मिळू शकतं. सध्या अधिकृतपणे कोणताही आदेश आलेला नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.