Government Urged to Give Written Assurance Again on Reservation : राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारपुढे ठेवल्या १४ मागण्या !
Nagpur : मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू केले आहे. त्याविरोधात मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मधून आरक्षण सरकारने देऊ नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 30 ऑगस्टपासून नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत साखळी उपोषण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे , महासचिव सचिन राजुरकर याचे प्रमुख उपस्थितीत सुरू केले आहे.
आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यापूर्वी 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मधून आरक्षण दिले जाणार नाही, असे लिखित वचन दिले होते. पुन्हा एकदा शासनाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाला मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार नाही, असे लिखित वचन देऊन महासंघाला आश्वस्त करावे. नाहितर तोपर्यंत महासंघाचे साखळी उपोषण सुरूच राहणार आहे.
Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांची जिवनवाहीनी होणार अतिक्रमणमुक्त !
30 ऑगस्ट रोजी संविधान चौकात सुरू झालेल्या साखळी उपोषणात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नामदेवराव भुयारकर, राजाभाऊ चिलाटे, गणेश नाखले,राजेंद्र काकडे, वसंतराव राऊत, हेमंत गावंडे, केशव शास्त्री, लहू राक्षे हिंगोली, चंद्रकांत हिंगे, राजू गोस्वामी, रंगराव गेचोडे इत्यादींचा सहभाग आहे.
या साखळी उपोषणाला आमदार अभिजीत वंजारी , आमदार प्रवीण दटके, माजी खासदार अशोक नेते, माजी नगरसेवक रमेश भुरसे, प्रकाश गेडाम, माजी नगरसेवक रमेश शिंगारे, गडचिरोली जिल्ह्याचे सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, प्राचार्य अशोक जीवतोडे, बबलू कटरे आदींनी भेट दिली.
Tribal Pardhi Community : आदिवासी पारधी समाजावर हल्ला, मोहात गावबंदी आणि हिंसाचाराचा वणवा
या उपोषणाला तिरळे कुणबी समाज, तेली समाज संघटना, ओबीसी संघर्ष समिती गोंदिया, ओबीसी समाज संघटना नागभिड, रिपब्लिकन आठवले गटाने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रमुख मागण्या –
१ मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये, तसेच सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
२ अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी
३ ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमात शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी
४ परदेशी शिष्यवृत्तीसाठी 75 विद्यार्थ्यांची संख्या वाढवून 200 करण्यात यावी
५ महाज्योती या संस्थेकरिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी
६ माडा व सिडकोतर्फे बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसींना आरक्षण लागू करण्यात यावे
७ नागपूर येथे तयार असलेले उच्च व तंत्र विभागाचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त बांधलेले 200 मुलींचे तयार वसतिगृह तसेच नागपूर येथे स्वर्गीय वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार असलेले 200 मुलांचे वस्तीगृह ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावे.
८ ओबीसी, विजा , भज व विमाप्र समुदायातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची तीन वर्षापासून प्रलंबित असणारी फेलोशि त्वरित अदा करण्यात यावी. यांसह 14 मागण्या महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
Babanrao Taywade : राज्यघटनेनुसार कोणत्याही समाजाला आरक्षण देता येत नाही !
या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा शेषराव येलेकर , कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर, परमेश्वर राऊत, शरद वानखेडे, शंकर मौर्य , निखिल भुते, नाना झोडे, विनोद इंगोले, वृषभ राऊत राहुल करांगडे, निलेश कोढे, दीपक कारेमोरे, कवडू लोहकरे आदी समर्थकांसह सहभागी झाले आहेत.