Nationalist Congress Party : दिव्यांगांसाठी काही पण ! नागपूरच्या कोणत्याही कोपऱ्यात १५ मिनीटांत पोहोचणार !

NCP city president Prashant Pawar is committed to the welfare of disabled people : ग्रामविकास विभागाच्या निर्णयानंतरही दिव्यांगांना नाही मिळत लाभ

Nagpur : नागपूर शहरातील दिव्यांग बांधवांना महानगरपालिका, कुठलीही शासकीय यंत्रणा किंवा आणखी कुणी त्रास देत असेल. कुणी त्यांच्या दुकानांच्या जागांवर अतिक्रमण करत असेल तर त्यांनी तात्काळ कॉल करावा मी १५ मिनीाटांत नागपूरच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचेन आणि समस्या निकाली काढेन, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष व प्रवक्ते प्रशांत पवार यांनी दिव्यांग बांधवांना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर शहर कार्यालयात दिव्यांग सेलच्या प्रदेशाध्यक्ष निता धवान यांच्या नेतृत्वात व शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या उपस्थितीत दिव्यांग बांधवांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी धवान यांनी दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ कसा मिळेल, हे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन टक्के अपंग व्यक्तीच्या कल्याण व पुनर्वसनाकरिता राखून ठेवून खर्च करावा. यासंदर्भात ग्रामविकास विभागाचा २५ जून २०१४ आणि १५ ऑक्टोबर २०१५ ला शासन निर्णय झाला आहे. तरीही दिव्यांग व्यक्तींना याचा लाभ मिळत नाही, असे निता धवान यांनी सांगितले.

Adv. Manikrao kokate : शेतकऱ्यांना मालामाल करणार ‘कृषी मॉल’!

अपंग महिला बचत गटांना सहाय्यक अनुदान देणे, मतिमंदांसाठी कायमस्वरुपी औषधोपचारांची गरज आहे, त्यांना मोफत औषध पुरवणे. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे, दिव्यांग व्यक्तींसाठी विनाअट घरकुल देण्याची योजना, दिव्यांग व्यक्तींना शहर व वाहूतक बसेसमध्ये मोफत पासेस देणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेष तसेच विशेष शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, निराधार व अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना विनाअट निर्वाह भत्ता देणे आदी मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मैदानात उतरणार आहे. यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.