Breaking

Nationalist Congress Party : काल पटेलांनी फटकारले, आता दादा घेणार क्लास !

Praful Patel scolded yesterday in Nagpur, now Ajit Pawar will take the class in Mumbai : विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावले

Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा मेळावा काल नागपुरात घेण्यात आला. या मेळाव्यात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी सर्वांनाच फटकारले. माजी वनमंत्री आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपवर थेट आरोप केले. त्यामुळे हा मेळावा चांगलाच चर्चेत राहिला. पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाची भाषा होत असताना विदर्भात खरेच राष्ट्रवादीचे बळ आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘फक्त टाईट कपडे घालून चालणार नाही. पक्षात राहायचे असेल तर पक्षाचे कामही करावे लागते. राष्ट्रवादी काँग्रेस २० वर्षांपासून सत्तेत आहे. तरी विदर्भात पक्ष वाढत नाहीये. कधी काळी ११ आमदार होते. पण आता केवळ ६ आमदार आहेत. पक्षाचे काम कुणीही करत नाही. प्रत्यक्ष काम काहीच नाही, अनेक जण फक्त मुंबईत दिसतात ‘, असे म्हणत प्रफुल पटेल यांनी सर्वांचाच समाचार काल (२३ मे) घेतला.

Akola Police : अकोल्यात अवैध सावकारांवर कारवाई; चौघांवर गुन्हे दाखल

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी विदर्भातील सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात मुंबईत बोलावले आहे. राष्ट्रवादीच्या सदस्य नोंदणीला विदर्भात अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अजित पवारांनी बैठक बोलावली आहे. अजित पवारही सर्वांचा क्लास घेणार असल्याची माहिती आहे. विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा सल्ला दिला आहे. पण विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे खरेच बळ आहे का, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

Heaven in hell : संजय राऊतांच्या पुस्तकात आर्यन खान अन् राज कुंद्रा !

धर्मरावबाबा आत्राम यांनी कालच्या मेळाव्यात महायुतीतील सहकारी पक्ष भाजप आणि शिवसेनेवर आरोप केले. विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधातील उमेदवाराला मदत करून दगा दिल्याचा थेट आरोप त्यांनी भाजपवर केला. हा आरोप राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळून लावला. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे सद्यस्थितील भाष्य बघता येत्या निवडणुकांत महायुती एकत्र लढणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.