Breaking

Navneet Rana : ‘ना सिंदूर राहील ना लावणारी’, पाकिस्तानातून आणखी एक कॉल

 

Former MP receives death threat from Pakistan : नवनीत राणांना धमकी; जीवे मारण्याचा दिला इशारा

Amravati भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचं वातावरण असतानाच अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून थेट जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. “ना सिंदूर राहील ना सिंदूर लावणारी” असा उल्लेख करत त्यांना धमकी देण्यात आली. सध्या त्या मुंबईत असून रविवारी मध्यरात्री पाकिस्तानातील विविध मोबाईल क्रमांकांवरून त्यांना हे कॉल आले.

या कॉलमध्ये, “तुझी सर्व माहिती आमच्याकडे आहे. तू हिंदू शेरनी आहेस, आता तुला काही दिवसांत संपवून टाकू,” अशी धमकी दिल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Navneet Rana : हिंदुस्थानावर डोळे वटाराल, तर डोळेच काढून घेऊ

धमकी मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यांच्या पतीसोबत तेथील पोलीस ठाण्यात उपस्थित होत्या. तक्रारीची प्रक्रिया सुरू असून याबाबत सविस्तर माहिती लवकरच देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Akola Ram Navami Celebration : रामनवमीच्या शोभायात्रेत राजकीय शक्तिप्रदर्शन!

नवनीत राणा यांना पूर्वीही अनेकदा धमक्या मिळाल्या असून, केंद्र सरकारकडून त्यांना ‘Y’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी हैदराबादहूनही त्यांना पत्राद्वारे धमकी आली होती. आता पाकिस्तानातून आलेल्या कॉलमुळे खळबळ उडाली असून, याबाबत केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनाही माहिती देण्यात आली आहे.