Breaking

Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांना व्हिडिओद्वारे जीवे मारण्याची धमकी

Former MP receives death threat via Instagram video : इन्स्टाग्राम युजरविरोधात गुन्हा दाखल; राजापेठ पोलिसांत तक्रार

Amravati : माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या एका शॉर्ट व्हिडिओद्वारे राणा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

६ ऑगस्ट रोजी रात्री हा व्हिडिओ नवनीत राणा यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, इन्स्टाग्रामवरील ‘इसाभाई’ या नावाने असलेल्या युजरने एक मिनिटाचा व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये नवनीत राणा यांच्याविरोधात अश्लील भाषेचा वापर करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Randhir Sawarkar : लाडक्या बहिणींचा अपमान राज्य सहन करणार नाही

या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी ७ ऑगस्ट रोजी दुपारी संबंधित युजरविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तसेच भादंवि कलमांतर्गत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत गुन्हा नोंदवला आहे.

Makrand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा

या प्रकारामुळे समाज माध्यमांवरील आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजकीय नेत्यांना उद्देशून सोशल मीडियावरून धमक्या देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. यापूर्वी देखील एकदा राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या व्हॉट्सएवर ऑडिओ मेसेजद्वारे ही धमकी मिळाली होती. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी हा प्रकार घडला होता, हे विशेष.