Breaking

Navneet Rana on Abu Azmi: अबू आझमी यांच्या वक्तव्यावर नवनीत राणा संतप्त

Demand to demolish Aurangzeb’s kabar : औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी

Amravati समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता, असे वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या या विधानावर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया देत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अबू आझमी यांनी “औरंगजेबाने अनेक मंदिरे बांधली होती, तो क्रूर नव्हता. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही हिंदू-मुस्लिम नव्हती, तर ती केवळ राज्यकारभाराची होती,” असे विधान केले. तसेच, “औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तानपर्यंत होती आणि देशाचा जीडीपी २४ टक्के होता,” असा दावा त्यांनी केला.

Birth certificate fraud : नायब तहसीलदारांना जन्मदाखले देण्याचा अधिकार दिला कुणी?

“अबू आझमींनी ‘छावा’ चित्रपट पाहावा” – नवनीत राणा

अबू आझमी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या, “अबू आझमी यांनी एकदा ‘छावा’ चित्रपट पाहावा. इतिहासामध्ये स्पष्ट आहे की, औरंगजेब हा क्रूर होता. त्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार केले. त्यांच्या डोळ्यात सळई टाकली. महाराष्‍ट्र सरकारने औरंगजेबला बाप म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे.”

नवनीत राणा यांनी पुढे सांगितले, “महायुती सरकार औरंगजेबाची कबर उखडून फेकणार आहे. ज्या लोकांना औरंगजेबावर प्रेम आहे, त्यांनी ती आपल्यासोबत घरी न्यावी.”

United Forum of Banks : शासकीय धोरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन

अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप आणि इतर हिंदुत्ववादी नेत्यांनी त्यांच्या विधानावर जोरदार टीका केली आहे. या मुद्द्यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.