Breaking

Naxalite Movement : तीन वर्षांत ९२ माओवाद्यांना अटक!

92 Maoists arrested in three years : आणखी दोन जहाल माओवादी ताब्यात; भामरागडमध्ये कारवाई

Gadchiroli गेल्या तीन वर्षांमध्ये माओवादी कारवाया रोखण्यात पोलीस प्रशासनाला मोठ्या प्रमाणात यश आलं आहे. २०२२ पासून आतापर्यंत ९२ माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तर काही जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण देखील केलं आहे. बुधवारी दोन जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आल्यामुळे पोलिसांनी कारवायांवर घट्ट फास आवळल्याचे स्पष्ट झाले आहे.

भामरागड तालुक्यातील कियेर गावात माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी यांची हत्या करणे. तसेच दिरंगी-फुलनार जंगलात चकमकीत सी-६० जवान महेश नागुलवार या जवानाचा बळी घेणे. आदी कारवायांमध्ये सक्रीय सहभाग असलेल्या दोन जहाल माओवाद्यांना पोलिसांनी आरेवाडा जंगलात अटक केली. कंपनी क्र. १० चा प्लाटून पार्टी कमिटी मेंबर केलू पांडू मडकाम उर्फ दोळवा (२६,रा. मुरकुम ता. उसूर जि. बिजापूर, छत्तीसगड) व भामरागड दलमची सदस्य रमा दोहे कोरचा उर्फ डुम्मी (३२,रा. मेंढरी ता. एटापल्ली) अशी त्यांची नावे आहेत.

Harshwardhan Sapkal : औरंगजेब व फडणवीस यांचा कारभार सारखाच!

दोन्ही माओवाद्यांवर शासनाचे ८ लाखांचे बक्षीस होते. छत्तीसगड सीमेवरील कियेर येथे माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी (४७) यांची १ फेब्रुवारीला गळा दाबून हत्या केली. त्यानंतर माओवाद्यांनी त्यांच्या मृतदेहावर पत्रक सोडले होते. दरम्यान, ११ फेब्रुवारी रोजी दिरंगी- फुलनार जंगलात पोलिस व माओवाद्यांत चकमक झाली होती. यात महेश नागुलवार या जवानाने माओवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली होती.

या दोन्ही प्रकरणांत या दोघांचा सक्रिय सहभाग होता. भामरागड तालुक्यातीलल आरेवाडा जंगल परिसरामध्ये ते दोघे फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिस पथक व सीआरपीएफच्या ३७ बटालियनचे जवान यांनी संयुक्त मोहीम राबवून त्यांना मोठ्या शिताफीने जेरबंद केले.

Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवार कडाडले; म्हणाले, केवळ अधिवेशन काळापूरतेच निलंबन का?

केलू पांडू उर्फ दोळवा हा २०१६ पासून माओवादी चळवळीत आहे. पामेड दलममधून त्याने सदस्य म्हणून भरती होत कारकीर्दीला सुरुवात केली. छत्तीसगड सीमेवरील चकमकीत त्याचा सक्रिय सहभाग होता. चकमकीचे ४ तर जाळपोळ व खुनाच्या दोन गुन्ह्यांत तो सामील होता. रमा दोहे उर्फ डुम्मी ही २०११ मध्ये चेतना नाट्यमंचशी जोडली गेली व २०१३ ते २०२३ या दरम्यान गट्टा दलममध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. सध्या ती भामरागड दलममध्ये काम करायची. ८ चकमकी, ६ खुनांत सहभागी असल्याचा तिच्यावर आरोप आहे.