Expulsion of Anuja Sawale from the party : पक्षविरोधी कारवायांमुळे श्रेष्ठींचा निर्णय
Buldhana राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसे पत्र महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सावळेंना पाठविले आहे. जिल्हाध्यक्षपदी कार्यरत असताना अनुजा सावळे यांनी जिल्ह्यात महिलांचे संघटन उभे केले नाही, ठपका ठेवण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षविरोधी उमेदवारांचे काम केले. त्या निष्क्रिय होत्या, असा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन अनुजा सावळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
यासंदर्भात चाकणकर यांनी अनुजा सावळे यांना पत्राद्वारे अवगत केले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाला मदत होईल, असे कोणतेही काम अनुजा सावळे यांनी केले नाही. उलट पक्षविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून निष्कासित करण्यात आले आहे. मंगळवारीच अनुजा सावळे यांनी जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी वेळोवेळी अपमान केल्याचे सांगत राजीनामा दिल्याचे म्हटले होते. तर आज सावळेंची हकालपट्टी झाल्याचा हुकूम आला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहे.
Animal Husbandry Department on ‘alert mode’ : बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी Rapid Response Team!
या प्रकरणावरून राष्टवादी काँग्रेस अजित पवार गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. अनुजा सावळे यांनी समाज माध्यमावर जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्यावर अपमास्पद वागणूक देत असल्याचा आराेप करीत राजीनामा दिला हाेता. त्यानंतर हे प्रकरण समाेर आले. सावळे यांचे आराेप काझी यांनी फेटाळून लावले हाेते. त्यानंतर दाेन्ही नेत्यांच्या समर्थकांनी आपआपल्या नेत्यांची बाजु मांडली हाेती.