NCP leaders in Vidarbha preparing for the local elections : सर्व स्थानिक निवडणुकांमध्ये जोर लावणार; आज कार्यकर्ता मेळावा
Nagpur महायुतीमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत लोकसभा आणि विधानसभेत झालेल्या जागावाटपावरील नाराजी आजही कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा प्रकार घडू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विदर्भाचे नेते कामाला लागले आहेत. सर्व निवडणुकांमध्ये जोर लावण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने पूर्व विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. येथील सहाही जिल्हा परिषदा व तीन महापालिकांमध्ये चांगली कामगिरी करून दाखवत आपली ताकद सिद्ध करण्यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी धडपड सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून २३ मे रोजी शुक्रवारी नागपुरातील परवाना भवन येथे नागपूर विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
विदर्भाकडे आमच्या सर्व प्रमुख नेत्यांचे लक्ष आहे. आज राष्ट्रवादी ही काँग्रेसच्या तुलनेत अधिक बळकट झाली असल्याचा दावाही त्यांनी केला. जागा वाटपाचा निर्णय स्थानिक पातळीवर होत नाही. महायुतीच्या तीनही पक्षांचे नेते एकत्र बसून जागा वाटपाची चर्चा करतील. त्यावेळी जे काही ठरेल त्याची अंमलबजावणी आम्ही करू. सध्या तरी आम्ही पूर्ण ताकदीने कामाला लागलो आहोत असे नागपूर विभागीय निरीक्षक राजू जैन यांनी स्पष्ट केले.
नागपूर विभागीय मेळाव्याला राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार राजू कारेमोरे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आमदार अमोल मिटकरी, मनोज कायंदे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
CM Devendra Fadnavis : झुडपी जंगलांबाबतचा निर्णय ऐतिहासिक, विकासाला चालना मिळेल
या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना ताकदीने लढण्याचा संदेश दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. – राष्ट्रवादीच्या शहर कार्यकारिणी बैठकीत नागपूर शहरात भाजपने किमान ४० जागा सोडाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे, हे विशेष.