Breaking

NCP Amravati : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य सप्ताह व सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

NCP’s Swarajya Week and member registration campaign launched : संघटनात्मक बांधणीसोबतच कार्यकर्त्यांना उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न

Amravati : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती ग्रामीणच्यावतीने कार्यालयाच्या जिल्हा प्रदेश प्राप्त कार्यक्रमानुसार स्वराज्य सप्ताह व सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, आमदार सुलभा खोडके उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना पक्षाच्या ध्येय-धोरणांबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान, सर्व तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणी अर्जांचे वितरण करण्यात आले. प्रत्येक तालुक्यातून सभासद नोंदणी अभियान सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना शासकीय योजनांची माहिती मिळण्यासाठी राष्ट्रवादी भवन, अमरावती येथे विशेष कक्ष स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनी सांगितले.

Pankaj Bhoyar : गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल लर्निंग प्रकल्प उपयुक्त

राजकीय पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसोबतच कार्यकर्त्यांना उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही स्पष्ट केले. विविध व्यवसायांबाबत मार्गदर्शन करून आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

Sanjay Rathod : ..अन् शाळेच्या ‘या’ उपक्रमांनी भारावले पालकमंत्री!

कार्यक्रमाला राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रताप भुयार, बाळासाहेब राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भाध्यक्ष निखिल ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रा. शोभना देशमुख, महिला कार्याध्यक्ष सुषमा बर्वे, शहराध्यक्ष प्रशांत डवरे, प्रवीण भुजाडे, गुडू पठाण, ऋतुराज राऊत, प्रशांत ठाकरे, सरला इंगळे, तारेश देशमुख, रवी बुरघाटे, गोविंद शिरोया, अजय अग्रवाल, माधुरी शिंगणे, तुषार चिखलकर, अब्दुल नईम अब्दुल जलील, दिनेश वंजारी, अभिजित हरणे, अभिषेक शुक्ला, संजय गुजर, मुंतसिर खान, राजेंद्र बारबदे, नितीन मेटकर, निलेश मापारी, अमोल अशोकसिंग गहेरवाल, बच्चू ठाकूर, विनोद तलवारे, दिलीप भोयर, अनिल सुरडकर, विजय वडस्कर, देवदत्त बेलसरे, रोहित पाल, बाबू गावनेर, अनंत राऊत, अॅड. जगदीश विल्हेकर, कुलदीप काळे, निलेश जुनघरे, मोहम्मद सईद, मधुकर इंगोले, प्रवीण खंडारे, दीपक चवरे, प्रमोद सावरकर, जीवन देशमुख, राजेंद्र निर्मळ, किशोर अब्रुक, दिलीप धोंडे, सुरेश मेटकर, सरदार खा, दयाराम वाट, शब्बीर खान, माधव शेंडे, राजेश बर्वे, नंदू टाले, प्रज्वल महात्मे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.