Breaking

NCP on Mahayuti Government : हे तर सरकारचे राजकीय षडयंत्र!

Controversy on Chhatrapati Sambhaji Maharaj award to Savarkar : छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने सावरकरांना पुरस्कार, डॉ. शिवानंद भानुसे यांचा आक्षेप

Buldhana महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून “छत्रपती संभाजी महाराज प्रेरणा गीत पुरस्कार” मराठी किंवा बोली भाषेतील प्रेरणादायी गीतांना देण्याची घोषणा केली होती. मात्र, २०२५ चा हा पुरस्कार विनायक दामोदर सावरकर यांच्या गीताला जाहीर करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) NCP Sharad Pawar पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने हा पुरस्कार सावरकरांना देणे म्हणजे जाणीवपूर्वक खोडसाळपणा करणे आणि राजकीय षडयंत्र आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Uddhav Balasaheb Thackeray : उद्धवसेनेत नाराजीसत्र; शहर प्रमुखाचा रामराम!

डॉ. भानुसे यांनी नमूद केले की, सावरकरांनी त्यांच्या “हिंदू पतपातशाही” या ग्रंथात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. तसेच, “इतिहासाची सोनेरी सहा पाने” या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही नकारात्मक लिखाण केल्याचा दावा त्यांनी केला.

त्यामुळे, “संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या नावाने पुरस्कार देणे हे महाराष्ट्र सरकारचे जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र आहे,” असा आरोप डॉ. भानुसे यांनी केला.

Udhhav Balasaheb Thakrey : महावितरण कार्यालयात वाळलेल्या मक्याचा पेंढा फेकला!

“राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सल्लागारांना याबाबत माहिती नाही का?” असा सवाल उपस्थित करत, “जर शिवप्रेमी व शंभूप्रेमींच्या भावना भडकल्या, तर त्याला संपूर्ण जबाबदार सरकार असेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.त्यामुळे, “हा पुरस्कार सावरकरांना न देता इतर कोणाला तरी द्यावा, अन्यथा महाराष्ट्रातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.