Amol Mitkari said that if Panduranga wants, Supriya Sule and Ajit Pawar will come together : राजकीय वर्तुळात उडवली खळबळ
Akola : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा जोरावर आहे, त्याचप्रमाणे शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्याही चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आमदार मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीपर्यंत बहीण – भाऊ (सुप्रिया सुळे आणि अजित पवार) एकत्र येऊ शकतात. हे सुचक वक्तव्य करून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडूवून दिली आहे. काही दिवसांपूर्ी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया देताना ‘तो निर्णय सुप्रिया सुळे घेतील’, असे म्हटले होते. आता आमदार मिटकरींच्या या वक्तव्यानंतर या एकत्रिकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
Prahar Jan Shakti Party : प्रहारचे सरकारला ‘कडू’ सवाल, ‘व्यंगचित्र’ बनले आवाज !
एकत्र येण्यास कोणाचाही विरोध नाही..
दोघेही (शरद पवार व अजित पवार) एकत्र येण्यास आमच्या पक्षाकडून कुठलाही विरोध नाही. मध्यंतरी अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या, पण आमच्याकडून विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. पवार साहेब आणि अजित पवार जे आदेश देतील, ते आमच्यासाठी शिरसावंद्य असतील, असेही आमदार मिटकरींनीू नमूद केले.
Neelesh Rane vs NItesh Rane: नीलेश राणेंचा बंधू नितेशला ‘सबुरीचा’ सल्ला
राज-उद्धव एकत्र आल्यास मराठी माणसाची ताकद वाढेल..
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्यावरही मिटकरी यांनी भाष्य केले. दोघे ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी माणसांची ताकद निश्चितच वाढेल. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे, असे ते म्हणाले. राजकीय समीकरणे निश्चितच बदलतील. मात्र, त्यांच्या एकत्र येण्याचा महायुतीवर परिणाम होईल, असे वाटत नाही. महायुती मजबूत आहे, असेही त्यांनी सांगितले. दोघांचा एकत्र येण्याचा निर्णय हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा आहे. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.








