NCP chief Ajit Pawar’s role will be clear in Nagpur today : नागपूरच्या गणेशपेठ कार्यालयात कार्यकर्ता मेळावा
Nagpur : पूर्व विदर्भातील विविध कार्यक्रमांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल (२० ऑगस्ट) रात्री ९ वाजता नागपुरात आगमन झाले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विजयगड या शासकीय निवासस्थानी ते मुक्कामी होते. आज (२१ ऑगस्ट) त्यांनी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. आज सायंकाळी गणेशपेठ येथील पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
‘स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महायुतीचा विचार सोडून द्या’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी काहीच दिसांपूर्वी केले होते. या पृष्ठभूमीवर अजित पवारांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. काल रात्री अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बंदद्वार चर्चा केल्याची माहिती आहे. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत पवार, शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर उपस्थित होते.
Public Health department : दोन डॉक्टरांसह १४ जणांचे निलंबन, आरोग्य क्षेत्रात खळबळ
काल रात्री झालेल्या बंदद्वार बैठकीत दादांनी पदाधिकाऱ्यांना पक्ष वाढवण्याच्या सुचना दिल्या. प्रफुल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी काय भूमिका मांडली, याबाबतीत माहिती मिळू शकली नाही. पण आज सायंकाळी पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा ते पक्षाच्या भूमिकेबद्दल काही बोलतील, असे काही पदाधिकाऱ्यांनी ‘सत्तावेध’शी बोलताना सांगितले.
Healthcare on the verge of collapse : एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामबंद संप तीव्र
आज सायंकाळच्या बैठकीला पक्षाचे निरीक्षक माजी आमदार राजेंद्र जैन हेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पक्षाची भूमिका आणि संघटनवाढीवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. नागपुरात तसेच विदर्भात संघटन वाढवण्यावर दादांनी जोर दिला असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे ‘स्थानिक’च्या निवडणुका महायुतीमध्ये लढणार की स्वबळावर, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कदाचित आज सायंकाळच्या बैठकीत या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल, अशी शक्यता स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वर्तवली.