Not a Women’s Commission, but Rupali Chakankar’s Commission of Threats : रोहीणी खडसे यांची घणाघाती टीका
कुणाच्या विरोधात चार ओळी लिहीण्याचे, प्रतिक्रिया व्यक्त करण्याचेही स्वातंत्र आता राहिलेले नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या विरोधात एक ट्विट काय केले, तर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या जातात. त्यासाठी कार्यकर्त्यांना सुपारी दिली जाते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी चाकणकरांवर हल्लाबोल केला आहे.
रोहीणी खडसे रुपाली चाकणकरांवर टीका करताना म्हणाल्या की, आता चाकणकरांचं पद जाणार आहे. त्या भीतीने त्यांच्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. सोशल मिडियावर पोस्ट लिहीली म्हणून कार्यकर्त्यांकरवी धमकावले जात आहे. पद जाण्याच्या भीतीने महिला आयोगाच्या अध्यक्ष या पातळीवर उतरल्या आहेत. महिलांना विरोध दर्शवण्याचीही मूभा राहिली नाही काय, असा प्रश्न रोहीणी खडसे यांनी उपस्थित केला आहे.
Nagpur District BJP : भाजपचे जिल्हाध्यक्ष लागले कामाला, कार्यकर्त्यांनाही दिल्या सूचना
आज (ता. २५ मे) सकाळी मी एक ट्विट केले. त्यात रुपाली चाकणकरांच्या महिला पदाधिकारी एका महिलेला धमकावतानाची ऑडिओ क्लीप आहे. आजचा सगळा प्रकार बघितला तर त्यांचे पद जाणार असल्यामुळे त्या वैफल्यग्रस्त झाल्या आहेत. विरोधात पोस्ट टाकणाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून धमकावण्याचे प्रकार त्यांनी सुरू केले आहेत. महिला आयोगाच्या ऐवजी ‘धमकी आयोग’ असे नाव आता ठेवले पाहिजे, असे खडसे म्हणाल्या.
Ravikant Tupkar : कर्जमुक्ती पीक विम्यासाठी सिंदखेडराजात ‘क्रांतिकारी’चा एल्गार !
महिलांना न्याय देण्याऐवजी ज्या महिलांसाठी हा आयोग आहे, त्या माता भगीणींना धमकावण्याचा प्रकार ऑडीओतून समोर आला. वैफल्यग्रस्त झाल्यामुळे त्या असं करत आहेत. वैष्णवीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. वैष्णवी हगवणेच्या समर्थनार्थ यांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला नाही. पण चाकणकरांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढता आला नाही. पण स्वतःच्या समर्थनार्थ चाकणकरांनी कार्यकर्त्यांकरवी मोर्चा काढला. हे कशाचे द्योतक आहे, असाही सवाल रोहीणी खडसे यांनी केला आहे.