Breaking

NCP Sharad Pawar : शरद पवार गटापुढे संघटन मजबूत करण्याचे आव्हान

Challenge of strengthening the organization before the Sharad Pawar group : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अस्तित्वाचा प्रश्न

Amravati महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत अपयश आले. तरीही कार्यकर्त्यांनी निराश न होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागावे. जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. अंतर्गत मतभेद विसरून माणसे जोडण्याच्या कामाला लागल्यास पक्षाला यश मिळण्यास वेळ लागणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन देशमुख यांनी स्पष्ट केले.

नेत्यांच्या या भाषणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटापुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्ष संघटन मजबूत करण्याचे मोठे आव्हान असल्याचे संकेत मिळत आहे. अजित पवार यांचा गट वेगळा झाल्यानंतर हे आव्हान पक्षापुढे उभे झाले आहे. आयएमए सभागृहात झालेल्या तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारविनिमय बैठकीत अध्यक्षीय भाषणातून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.

District Central Co-operative Bank : आजोबांच्या बँकेत आता नातू झाला संचालक!

या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नियोजनबद्ध पक्ष बांधणी करणे. शासनाच्या विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे. शेतकरी व शेतमजुरांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. अपयशातूनच यश मिळते, हे लक्षात ठेवून कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे, असे आवाहन करण्यात आले.

Crime in Hinganghat : इंस्टाग्रामवर पोस्ट केली; थेट खूनच केला!

बैठकीच्या अध्यक्षस्थानी हर्षवर्धन देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून पं. स. माजी सभापती राजाभाऊ कुकडे, शेंदूरजनाघाटचे माजी नगराध्यक्ष जगदीश काळे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. समीर अली, युवा नेते गिरीश कराळे, माजी जि. प. सदस्य रामदास धुर्वे, सेवादल तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर यावले, तालुकाध्यक्ष राजेंद्र बहुरूपी, शहराध्यक्ष डॉ. प्रवीण चौधरी, महिला तालुकाध्यक्ष रत्ना ढोले, शहराध्यक्षा प्रज्ञा बोडखे आदी उपस्थित होते.