Forget the election failure and start working again : पक्ष बळकट करण्याचा बाबाराव खडसे यांचा निर्धार
Washim विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) ला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. तरीही पक्ष पुन्हा मजबुतीने उभारण्याचा निर्धार केला आहे, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे यांनी सांगितले.
वाशिम येथे आयोजित पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा निरीक्षक प्रा. विश्वनाथ कांबळे, ज्येष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली मेश्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योतीताई गणेशपुरे, ओबीसी जिल्हाध्यक्ष मनिष चिपडे, तसेच तालुकाध्यक्ष रमेश गोटे (वाशिम), भगवानराव शिंदे (मालेगाव), बाबाराव पाटील टोपले (मंगरुळपीर), गजाननराव सरनाईक (रिसोड) आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Guardian Minister Makrand Patil : जिल्हा वार्षिक योजनेस ५१९ कोटींची मान्यता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद (जि.प.), पंचायत समिती (पं.स.), नगर परिषद (न.प.) निवडणुका काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. बाबाराव खडसे म्हणाले, “विधानसभेच्या निवडणुकीत जागा कमी आल्या म्हणून आपण खचून जाणार नाही. आम्ही लढण्यास तयार आहोत. ९४ वर्षीय शरद पवार यांनी अनेक यश-अपयश पचवले आहेत आणि आजही त्यांचे नेतृत्व अविचल आहे.”
राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या विरोधात लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. “जे जनतेच्या संपर्कात राहतात, त्यांनाच जनता सत्तेवर बसवते,” असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्ष निरीक्षक प्रा. विश्वनाथ कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांना एकजुटीने पुढे जाण्याचे आवाहन केले.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा एक कॉल अन् सोनपेठ तीर्थस्थळाचा प्रश्नच सुटला!
जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी समन्वय साधावा. तालुका आणि गाव पातळीवर पक्ष संघटन अधिक बळकट करावे. जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याशिवाय आम्ही जिल्ह्यात वेळोवेळी भेटी देत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता यांच्यात समन्वय साधण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, असंही ते म्हणाले