Forget the failure and rebuild the organization : संघटनेची नव्याने बांधणी; अपयश विसरून भरारी घेण्याचा निर्धार
विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश विसरून पुढे जाण्याचा निर्धार शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला आहे. बुलढाणा येथे झालेल्या बैठकीत नेत्यांनी नव्याने संघटन बांधणी करण्याचा निर्धार केला. यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या विचारांवर आधारित नव्याने संघटन उभे करण्याचा निर्धार बुलढाण्यात व्यक्त करण्यात आला. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या विशेष बैठकीत माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पक्षाच्या भविष्यातील कार्ययोजनांवर प्रकाश टाकला.
Uddhav Balasaheb Thackeray : सोयाबीनचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत केंद्र सुरू ठेवा
१० जून १९९९ रोजी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी काही जणांनी हा पक्ष अल्पकाळ टिकेल, असे भाकीत केले होते. मात्र, पक्षाने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. केंद्रातही सहभागी झाला आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व गाजवले. आज विविध चढ-उतार, पक्षफुटी यानंतरही राष्ट्रवादी पुढे चालत आहे,’ असं शिंगणे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतरही पक्ष नव्याने भरारी घेईल. बुलढाण्यात शरद पवारांच्या विचारांचे संघटन पुन्हा उभारले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर होत्या. जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके, माजी जिल्हाध्यक्ष साहेबराव सरदार, प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
Dr. Pankaj Bhoyar : अनाथ, दिव्यांगांसोबत पालकमंत्र्यांचा एक दिवस!
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘पक्षविभाजनानंतर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. मात्र, विधानसभेत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीला यश मिळाले नाही. परिणामी आपल्या पक्षालाही पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही शरद पवार नव्या ऊर्जेने पक्षबांधणी करत आहेत. या संकटाला संधी मानून नवीन निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडून भक्कम संघटन निर्माण करणे गरजेचे आहे.’