NCP Sharad Pawar : रस्त्यांची वाईट अवस्था, नागरिकांचे होताहेत हाल

Party leaders met Municipal Commissioner Regarding Poor Condition of Roads : दुरावस्थेवर राष्ट्रवादीचा इशारा, महापालिका आयुक्तांना निवेदन

Akola शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) अकोला महानगरतर्फे महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, माणिक टॉकीज चौक–तेलीपुरा, तेलीपुरा–अशफाक उल्ला चौक, अकोट स्टँड–दीपक चौक, अग्रेसन चौक–दामले चौक तसेच अकोट स्टँड–दामले चौक या प्रमुख मार्गांसह शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची स्थिती अत्यंत जीर्ण झाली आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे व खचलेले भाग यामुळे वाहनचालक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याचबरोबर पाठदुखी, कंबरदुखी यांसारख्या आरोग्य समस्यांमध्येही वाढ होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Nitin Gadkari : फुटाळा फाऊंटेनच्या कामाला गती द्या

हे निवेदन उपायुक्त विजय परतवार यांना देण्यात आले. यावेळी महानगराध्यक्ष रफीक सिद्दीकी, प्रदेश संघटक सचिव जावेद जकरिया, कार्याध्यक्ष सैयद युसुफ अली, देवेन्द्र ताले आणि पश्चिम विधानसभा अध्यक्ष मेहमूद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शेख अजीज, चांद खान, बाबाराव घुमरे, जमील खान, अल्ताफ खान, वसीम खान, मोहम्मद शफीक (पप्पू), आनंद वैरारे, शैलेश बोदडे, शेख रमजान, भाऊराव साबरे, सुभान गोरवे व अमन घरडे उपस्थित होते.

Nitin Gadkari : अडचणींपासून पळू नका, निधड्या छातीने सामना करा

राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेच्या निष्काळजीपणावरही टीका करताना म्हटले की, अलीकडेच नव्याने डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिटीकरण झालेले अनेक रस्ते अल्पावधीतच उखडले आहेत, यावरून ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे स्पष्ट होते. अशा ठेकेदारांची तातडीने चौकशी करून दोषींना काळ्या यादीत टाकावे, तसेच सार्वजनिक निधीची उधळपट्टी रोखण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.