Sharad Pawar Faction Replaces District President : स्थानिक निवडणुकांचे मोठे आव्हान, तरुण नेतृत्वाला संधी
Buldhana दीर्घ चर्चेनंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ने बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी तरुण आणि एकनिष्ठ कार्यकर्ते नरेश शेळके यांची नियुक्ती केली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते शेळकेंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, तसेच प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. माजी जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकर यांनी नुकताच राजीनामा दिल्यानंतर ही जबाबदारी शेळकेंच्या खांद्यावर सोपविण्यात आली.
शरद पवार गटाने संघटनात्मक पुनर्बांधणीसाठी तरुण, एकनिष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या धोरणानुसारच नरेश शेळकेंची निवड झाली.
मुंबईत नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर शेळके यांनी शरद पवारांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. त्यांनी सांगितले की, “संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे आणि पक्षाच्या विचारसरणीला गावागावांत नेणे हीच माझी प्राथमिकता असेल.”
Compensation : उध्वस्त शेतकऱ्यांना 3 ते 21 रुपयांची नुकसानभरपाई !
नरेश शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत विविध पदांवर काम करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अशा पदांवर कार्यरत राहिले आहेत.
ते खासदार सुप्रिया सुळे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी “शिलेदार निष्ठेचे” हा उपक्रम राबवून पक्षनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी दाखवली आहे.
Teachers’ Constituency Election : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसची पूर्वतयारी
या नियुक्तीनंतर नरेश शेळकेंसमोर तातडीचे आव्हान म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. पक्षातील अंतर्गत नाराजी कमी करणे, निष्ठावंत कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि ग्रामीण पातळीवर संघटन बळकट करणे — ही त्यांची तातडीची जबाबदारी ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर शरद पवार गटाला बुलढाण्यात पुन्हा स्थिर करण्याची मोठी जबाबदारी शेळकेंच्या खांद्यावर आली आहे.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana : पीक विम्यापोटी फक्त ५ रुपये; संतप्त शेतकऱ्यांनी रक्कम केली परत!
शरद पवार गटाने जिल्हास्तरावर तरुण नेतृत्वाला दिलेली ही जबाबदारी संघटनात्मक परिवर्तनाचे द्योतक मानली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये शेळकेंची रणनीती आणि नेतृत्वकौशल्य हेच पक्षाच्या पुनरुज्जीवनाचे केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








