Shashikant Shinde advised party workers to increase public outreach : शशिकांत शिंदेंनी कार्यकर्त्यांना दिला विजयाचा कानमंत्र
Akola महायुती सरकारच्या काळात सामान्यांच्या अनेक मूलभूत समस्या प्रलंबित असल्याने जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य पूर्ण करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
अकोला शहरातील पोलिस लॉन येथे झालेल्या जिल्हा कार्यकर्ता आढावा सभेत ते बोलत होते. या सभेत शिंदे यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून कामाचा आढावा घेतला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
India Alliance : संविधान विरोधी जनसुरक्षा कायदा २०२४ रद्द करा
या वेळी माजी मंत्री व पक्षाचे विदर्भ प्रभारी डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, शहराध्यक्ष मो. रफिक सिद्दीकी, प्रा. विश्वनाथ कांबळे, सै. युसूफ अली, श्याम अवस्थी, पांडुरंग ठाकरे, गणेश राय आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Shakuntala Railway : ३६ आंदोलनांनंतर ‘शकुंतला’चे ग्रहण सुटले!
तयारीला लागण्याच्या सूचना
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. कोणत्याही क्षणी आयोगाकडून घोषणा होऊ शकते. ऐन वेळेवर तयारी करण्यापेक्षा आतापासून कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागल्याने येत्या काळात चांगलीच रंगत बघायला मिळणार आहे.