NCP Strategy Workshop : ‘ती’ जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची !

Ajit Pawar to Speak on Local Matters, Fadnavis Shoulders Crucial BJP Role : चिंतन शिबिरात अजित पवार करणार ‘स्थानिक’वर चर्चा !

Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्याव्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तब्बल सात वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये नव्या लोकप्रतिनिधींना संधी मिळावी, यासाठी सर्व राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यामध्ये वेग घेतला आहे. त्यासाठी चिंतन शिबिर घेत आहोत. या शिबिरात स्थानिकच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा होणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितले.

नागपुरात आज (१९ सप्टेंबर) राष्ट्रवादीचे राष्ट्रीय चिंतन शिबिर होत आहे. या शिबिरासाठी काल येथे आले असता अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ज्यांना आमदारकी किंवा खासदारकीची संधी मिळत नाही, त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये निवडून येऊन आपली कामगिरी दाखवता येते. त्यासाठी या निवडणुका महत्वाच्या असतात. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठीसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाच्या आहेत.

Jigao Project : जिगाव प्रकल्पग्रस्तांचे अर्धनग्न आंदोलन

वादग्रस्त विधानांसाठी गोपीचंद पडळकर प्रसिद्ध आहेत. यासंदर्भात प्रश्न विचारला असता, वादग्रस्त विधानांसंदर्भात आमच्या महायुती सरकारचं एकमेव धोरण आहे. महायुती पक्षामधील तीन पक्षांतील ज्या लोकांनी ते विधान केलं आहे, त्या त्या पक्षांच्या नेत्यांनी त्या त्या विधानसंदर्भात नोंद घेतली पाहिजे आणि भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं आमचं धोरण आहे. शिवसेनेसंदर्भात जर काही वादग्रस्त विधान झाले तर एकनाथ शिंदे बोलतील. आमच्या पक्षाकडून जर काही विधान झालं त्याची जबाबदारी माझी आहे आणि भाजपच्या संदर्भात ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

Vijayraj Shinde : शेलापूर मेळाव्यातून भाजपचे रणशिंग, तयारीला लागले

गोपीचंद पडळकर यांनी काय विधान केलं, याची माहिती सध्या तरी माझ्याकडे नाही. पण मी याच विचाराचा आहे की, कोणी कोणत्याही राजकीय विचाराचा असो तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे, एक संस्कृती आहे , महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला आहे . त्यामुळे प्रत्येकाने बोलत असताना वागत असताना वादग्रस्त स्टेटमेंट देऊ नये. असे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात त्यामुळे अशा प्रकारचे स्टेटमेंट करू नये आणि संविधानाने आणि घटनेने आपल्याला अधिकार दिला आहे, त्याचा वापर करत असताना समाजामध्ये सलोखा राहील आणि वातावरण चांगले राहील, असा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, असेही पवार म्हणाले.