Breaking

NCP : राष्ट्रवादी म्हणते, ‘लोक सिग्नल पाळत नसतील तर काढून फेका’

Warning to the administration to protest to remove the traffic signals : ‘सिग्नल हटाव’ आंदोलन छेडण्याचा प्रशासनाला इशारा

Buldhana शहरातील प्रमुख चौकांमध्ये लाखो रुपये खर्चून ट्राफिक सिग्नल बसवण्यात आले. आता नागरिकच या सिग्नल्सकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे लोक सिग्नल पाळणार नसतील तर ते काढून फेका, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाला दिला आहे. विशेष म्हणजे सिग्नल पाळले जात नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस लोकांच्याच विरोधात ‘सिग्नल हटाव’ आंदोलन करणार आहे. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेमका कुणासोबत पंगा घेण्याच्या तयारीत आहे, हेच लोकांना अद्याप कळलेले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मंगेश बिडवे यांनी जिल्हाधिकारी आणि वाहतूक विभागाला निवेदन सादर केले आहे. शहरातील चौकांमध्ये बसविण्यात आलेले सिग्नल सुरू आहेत. मात्र तरीही वाहनचालक त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांच्या समोरच सिग्नल तोडले जात आहेत. पण पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे यांचं एक ‘ ट्विट’, आणि ‘ सस्पेन्स’ वाढला

शहरातील शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्याने सकाळ-संध्याकाळच्या वेळेस रस्त्यांवर विद्यार्थ्यांची गर्दी असते. अशावेळी सिग्नलचे काटेकोर पालन आवश्यक आहे, अन्यथा अपघातांची शक्यता वाढते, असेही निवेदनात नमूद आहे.

मागील काही वर्षांपूर्वीही शहरात सिग्नल बसवण्यात आले होते, परंतु त्याचा प्रत्यक्ष उपयोग झालाच नाही. त्यामुळेच यावेळी देखील केवळ कंत्राटदारांना मलई मिळावी म्हणूनच सिग्नल बसवले गेले असावेत, असा संशय राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला आहे.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : हाच का तो विकास, म्हणत विकास ठाकरे धो-धो बरसले !

जर प्रशासनाने तत्काळ योग्य पावले उचलली नाहीत, तर “सिग्नल तोडो – सिग्नल हटाओ” अशा आंदोलनाची हाक दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनावर शहराध्यक्ष मंगेश बिडवे यांच्यासह सत्तार कुरेशी, महेश देवरे, मनिष बोरकर, सुजित देशमुख, दिपक गायकवाड आणि अनिल बावस्कर यांच्या सह्या आहेत.