Breaking

Neelam Gorhe : उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या बॉडीगार्डकडून आमदाराला धक्काबुक्की !

MLA Varun Sardesai pushed by Deputy Speaker’s bodyguard : ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई संतापले

Mumbai : उपसभापती नीलम गोऱ्हे विधिमंडळ परिसरातून जात असताना तेथून जात असलेले आमदार वरूण सरदेसाई यांना सुरक्षारक्षकांनी बाजूला ढकलले. यावरून एकच गोंधळ उडाला. सरदेसाई यांनी या प्रकारावरून संताप व्यक्त केला. नीलम गोऱ्हे यांनी सुरक्षारक्षकाची बाजू घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा प्रकार दुसऱ्यांचा झाला आहे अशी तक्रार करत सरदेसाई यांनी आमदारांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे अशी मागणीही केली.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षारक्षकाकडून धक्काबुक्की करण्यात आली. उपसभापती नीलम गोऱ्हे विधिमंडळ परिसरातून जात असताना तेथून चालत जात असलेले आमदार सरदेसाई यांना सुरक्षारक्षकांनी बाजूला ढकलले, असा आरोप सरदेसाई यांनी केला. तसेच गोऱ्हे यांच्या सुरक्षारक्षकां कडून दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्याचेही ते म्हणाले.

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : अधिवेशन संपल्यावर होणार ‘त्या’ शिक्षकांचा पगार !

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दुपारच्या वेळी उपसभापती नीलम गोऱ्हे विधिमंडळातून मुख्य द्वारातून बाहेर पडल्या. त्यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या सुरक्षारक्षकांकडून आजूबाजूला असलेले लोक हटविले. यादरम्यान त्यांनी आमदार वरुण सरदेसाई यांनाही बाजूला ढकलले. हे पाहून सरदेसाई यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासमोरच सुरक्षारक्षकांना सुनावले.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार स्वतः करणार जुनगाव पुरग्रस्त भागाची पाहणी !

नीलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, सरदेसाई म्हणाले, हे वारंवार होत आहे. आम्ही आमदार आहोत. अशा पद्धतीने ढकलायला इथे कोणी अतिरेकी घुसले आहेत का? अशा पद्धतीने अडवण्याचे कारण काय? समजा ते आम्हाला ओळखत नसतील, पण आमच्या छातीवर आम्ही आमदार असल्याचा बॅच त्यासाठी लावतो. सभागृह परिसरात आम्हालाच अशी वागणूक मिळत असेल तर काय उपयोग. आमदारांचा सन्मान हा राखलाच गेला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.