Breaking

Neelesh Rane vs NItesh Rane: नीलेश राणेंचा बंधू नितेशला ‘सबुरीचा’ सल्ला

Nitesh Rane’s statement creates a stir in political circles: नितेश राणे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Mumbai : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते नितेश राणे वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. सत्ताधारी पक्षातील नेतेच एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. नितेश राणे यांच्या एका वक्तव्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. त्यांचे मोठे भाऊ आणि शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी त्यांना जपून बोलण्याचा म्हणजे ‘सबुरी’चा सल्ला दिला आहे.

काही महिन्यांवर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सर्व पक्ष तयारी करत आहेत. तर दुसरीकडे आरोप- प्रत्यारोपांनी जोर धरला आहे. त्यातच नितेश राणे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांचे बंधू नीलेश राणे यांनी त्यांना सार्वजनिक ठिकाणी जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे.

Local Body Elections : काँग्रेसमध्ये ‘बॅटींग लाईन चेंज’ सपकाळांनी दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते काढले बाहेर !

निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे इतरांपेक्षा आपणच श्रेष्ठ हे दाखवण्यासाठी आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच नितेश राणे यांनी, भाजपच श्रेष्ठ हे सांगताना इतरांना दुखावणारे वक्तव्य केले. यामुळे महायुतीतील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नीलेश राणे यांनी आपल्या लहान भावाला सार्वजनिक ठिकाणी विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत म्हणले आहे की, “नितेशने जपून बोलावे… मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही

Ladki Bahin Yojna : लाडक्या बहीणींमुळे राज्य संकटात, शिंदेंच्या आमदाराचा प्रहार !

भाजपची पाठराखण करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत. हा वाद आणखी वाढू नये यासाठी मोठे बंधू असलेले आ. निलेश राणे यांनी लहान भावाला सबुरीचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्यामुळे राजकीय चर्चा अधिकच वाढले आहेत.

  • सचिन काटे (विशेष प्रतिनिधी)

    २७ वर्षांपासून विविध राज्यस्तरीय दैनिकांमध्ये रिपोर्टरपासून कार्यकारी संपादक पर्यंतचा विस्तृत अनुभव. डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात ही यशस्वी योगदान.