New controversy : ‘देवाभाऊ’ जाहिरातींवरून नवा वाद! रोहित पवारांचा गौप्यस्फोट !

The advertisements given by minister of allied party, not BJP : जाहिराती भाजप नव्हे तर मित्रपक्षाच्या मंत्र्याने दिल्या

Mumbai : अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यातील सर्व प्रमुख दैनिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पानावर तसेच विमानतळांवर झळकलेल्या ‘देवाभाऊ’ या निनावी जाहिरातींवरून मोठा राजकीय वाद पेटला आहे. मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ झळकलेल्या या जाहिरातींचा उगम नेमका कुठे आहे, याबाबत संभ्रम व्यक्त होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी धक्कादायक दावा केला आहे.

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, या जाहिराती भाजपकडून नव्हे तर सरकारमधील मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने दिल्या आहेत. “या जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण आहे? जाहिराती देणारे समोर आले, तरच या प्रश्नांची उत्तरं मिळतील,” असे पवारांनी स्पष्ट केले.

Amravati Municipal Corporation Elections : अमरावती महापालिका निवडणुकीत ‘फोडाफोडीचे राजकारण’?

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने जीआर काढून तात्पुरता तोडगा काढला. या निर्णयामुळे सर्व बाजूंचं समाधान झाल्याचं बोललं जात असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मास्टरस्ट्रोक’ मारल्याची चर्चा रंगली. याच पार्श्वभूमीवर ‘देवाभाऊ’ जाहिराती मोठ्या प्रमाणावर झळकल्या.

मात्र, या जाहिराती निनावी पद्धतीने प्रसिद्ध झाल्याने सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात संताप व्यक्त झाला. जाहिरात देताना स्रोत म्हणजे सोर्स नमूद करणे बंधनकारक असतानाही, या जाहिरातींमध्ये कुठलाही स्रोत दिला नव्हता. त्यामुळे “नेमक्या या जाहिराती दिल्या तरी कोणी?” हा प्रश्न उपस्थित झाला होता.

OBC Reservation : ओबीसींची व्युहरचना ठरली, दोन स्तरांवर लढणार आरक्षणाची लढाई !

 

रोहित पवार यांनी सरकारवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरी उध्वस्त झाले आहेत. अशा वेळी कोट्यवधी रुपये जाहिरातींसाठी उधळणं योग्य आहे का? देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करतील असं वाटत नव्हतं. पण माहिती मिळाली आहे की, हे सगळं परस्पर मित्रपक्षाच्या मंत्र्याने केलं आहे.”
रोहित पवार यांच्या या खुलाशामुळे राजकारणात उत्सुकता वाढली आहे. “मित्रपक्षाचा मंत्री कोणी? त्याने मुख्यमंत्र्यांच्या नावाने एवढ्या जाहिराती निनावी पद्धतीने का दिल्या? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोट्यवधींचा खर्च आला कुठून?” अशा सलग प्रश्नांची मालिका पवारांनी उपस्थित केली आहे.

Modi on Trump : राष्ट्राध्यक्षांच्या भावनांबद्दल ‘तहे दिल से सराहना करते हैं’

आता या जाहिरातींचा खरा सूत्रधार कोण हे उघड होणार का, आणि सरकार याबाबत काय स्पष्टीकरण देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

_____