New equation : महायुतीविरोधात नव्या समीकरणांची सुरुवात!

Joint meeting of MNS- MAVIA leaders with Awhad: Thane Thaneआव्हाडांची मनसे-मविआ नेत्यांची संयुक्त बैठक

Thane : ठाण्यामध्ये महायुतीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीमुळे ठाण्याच्या तसेच राज्याच्या राजकारणात हलचल वाढली आहे.

या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः या बैठकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून बैठकीबाबत माहिती दिली आहे.

Reservation controversy : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ओबीसी नेत्यांचा संताप!

आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण अशा आम्हा चौघांमध्ये ठाण्यातील विविध नागरी प्रश्नांवर सुमारे तासभर चर्चा झाली.” या चर्चेदरम्यान ठाण्यातील वाहतूक कोंडी, डंपिंगची समस्या, पाणीटंचाई, तसेच रस्ते आणि मेट्रो कामांमुळे निर्माण झालेल्या नागरी अडचणींवर सखोल चर्चा झाल्याचे समजते.

या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महायुतीविरोधात मनसे आणि मविआ एकत्र येणार का, हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काही राजकीय निरीक्षकांच्या मते, ही बैठक महायुतीविरोधात एकत्र येणाऱ्या पक्षांच्या नव्या समीकरणांची सुरुवात ठरू शकते.

, या हालचालींचे राजकीय परिणाम आगामी काळात दिसून येऊ शकतात. लवकरच या नेत्यांकडून मोर्चा काढण्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे ठाण्याच्या राजकीय पटावर नव्या युतीचा शुभारंभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Kadam Vs Parab : मी नार्को टेस्टसाठी तयार आहे, पण आता कोर्टातच उत्तर देईन

महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीने चर्चेला अधिक रंग चढला आहे. ठाण्यातूनच मनसे आणि मविआच्या संभाव्य एकत्रीकरणाचा प्रारंभ होणार का, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात गुंजत आहे. या बैठकीच्या माध्यमातून विरोधक एकत्र येण्याचे पहिले पाऊल पडल्याचे स्पष्ट संकेत दिसत असून, आगामी निवडणुकांपूर्वी ठाण्यातील राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.