Narendra Modis direct warning to Pakistan on his birthday : वाढदिवशी नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
Dhar : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार 17 सप्टेंबर रोजी आपला 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या दिवशी मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यातील कार्यक्रमातून त्यांनी देशातील महिलांसाठी मोठी आरोग्य योजना सुरू केली. मात्र, याच व्यासपीठावरून त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा देत, “हा नवा भारत आहे, घरात घुसून मारतो” असा जोरदार संदेश दिला.
मोदी म्हणाले, “पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींचं सिंदूर उजाडलं. त्यानंतर आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’ करून दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. आमच्या वीर जवानांनी पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं. आता कालच जगाने बघितलं की पुन्हा पाकिस्तानी दहशतवादी रडत रडत आपली परिस्थिती सांगत होते. हा नवीन भारत आहे, हा कोणाच्या परमाणू धमकींना भीत नाही.”
Kunbi certificate : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू
मोदी म्हणाले, “आजच्याच दिवशी भारतीय सैन्याने अनेक अत्याचारांतून हैद्राबादची मुक्तता केली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस आम्हाला प्रेरणा देतो. भारताच्या आन, बाण, शानपेक्षा मोठं काहीच नाही. आम्ही जगलो तरी देशासाठी, प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित होवो.”
वाढदिवशी मोदींनी महिलांसाठी नवी आरोग्य मोहीम सुरू केली. “निरोगी महिला म्हणजे मजबूत कुटुंब. महिलांसाठी महाग चाचण्या आणि औषधे आता मोफत उपलब्ध करून दिली जातील. सरकारी तिजोरीपेक्षा मातांच्या आरोग्याला जास्त महत्त्व आहे. देशातील माता-भगिनींनी थोडा वेळ स्वतःसाठी काढावा,” असं आवाहन त्यांनी केलं.
मोदींनी आपल्या भाषणात ‘विकसित भारत यात्रे’च्या चार स्तंभांचा उल्लेख केला – नारीशक्ती, युवा शक्ती, गरीब आणि शेतकरी. त्यांनी सांगितलं की, “आज भारताच्या लोकांनी विकसित भारत बनवायचा संकल्प घेतला आहे. धारमधील हा कार्यक्रम खरं तर संपूर्ण देशासाठी आहे.”
Nitin gadkari : गडकरींना सहा महिन्यांसाठी दुबईला एक्सपोर्ट करा !
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाढदिवशी दिलेला पाकिस्तानला इशारा आणि महिलांसाठी केलेली मोठी घोषणा ही फक्त मध्यप्रदेशापुरती मर्यादित न राहता देशभरातल्या निवडणूक वातावरणालाच नवा वेग देणारी ठरत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.