Rahul Gandhi, Supriya Sule, Sanjay Raut are three idiots : आम्ही त्या शेंबड्यांसारखे रडत बसलो नव्हतो
Nagpur : मुख्यमंत्र्यांनी गोड्या पाण्यातील माशा संदर्भातील अजेंडा आमच्यासमोर दिला आहे. त्या दृष्टिकोनातून आज (७ फेब्रुवारी) नागपूर जिल्ह्यातील मत्स्य पालन उत्पादन वाढ आणि मत्स्य पालन करणाऱ्यांना मदतीसंदर्भात बैठक घेतली. मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे उत्पादन वाढलं नाही तर त्यासाठी एक प्लान करून दर तीन महिन्यातून याची बैठक घेऊ, असे मत्स्य विभाग मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मत्स्य विभागाची बैठक घेतल्यानंतर राणे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गोड्या पाण्यात मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना मदत करण्यासाठी मत्स्य विद्यालयाची मदत कशी घेता येईल, यावरही विचार सुरू आहे. आमच्या कोकणातील मच्छीमारांचे उत्पादन ज्याप्रमाणे जास्त आहे. त्याप्रमाणे विदर्भातही उत्पादन वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली. त्यासंदर्भात विचारले असता, मी आज ऐकल आहे की, थ्री इडियट्सची पत्रकार परिषद झाली. त्या तीन मधील दोन तर ईव्हीएमवर निवडून आले आहेत. राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे हे ईव्हीएमवर निवडून आले. एक शिवसेनेच्या आमदारांच्या आशीर्वादाने बॅक डोअरमधून निवडून आलेला आहे. भांडुपचा देवानंद संजय राजाराम राऊत याच्यासह या तिघांची विश्वासार्हता काय, असा सवाल राणे यांनी केला.
तिघांमध्ये दोघं ईव्हीएम वर निवडून आले असतील. तर मग लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही. लोकसभेत भाजपला कमी जागा मिळाल्या. तेव्हा भाजप त्यावेळी या शेंबड्यांसारखा रडत बसला नाही. तर आम्ही कामाला लागलो. मेहनत घेतली. त्यामुळे हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही सत्ता आणून दाखवली. आम्ही लोकांचा विश्वास संपादन केला. यांच्याप्रमाणे शेंबड्यासारखे रडत बसलो नाही, असा सणसणीत टोला नितेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.
Warning of Irrigation Department : प्रशासनाचा हलगर्जीपणा, नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट
त्यांचे जे निवडून आलेले खासदार आहेत, त्यांनी राजीनामे द्यावे. नंतर बॅलेट पेपरवर निवडून यावं. मग बघावं की त्यांच्या नावासमोर खासदार लागते की माजी खासदार? महाराष्ट्रातील सरकार हिंदुत्वाच्या नावाने निवडून आले, हे यांचं दुःख आहे. आमच्या काही काही उमेदवारांना सहा-15 अशी मतं मिळाली आहे. मालेगावमध्ये एकाच मतदारसंघात एक-एक, दीड-दीड लाख मतदान झाल्याने त्यांचा खासदार निवडून आला. मग आम्ही यांच्यासारखे शेंबड्यांसारखे रडत बसायचे का, असाही सवाल त्यांनी केला.
खारघरमध्ये एका हिंदू तरुणावर गळ्यात रुद्राक्ष माळ आणि टी-शर्टवर श्रीराम लिहिले होते म्हणून हल्ला झाला. तो मोहम्मद सहा नावाचा तब्लिकी जमातचा प्रवक्ता आला होता. ते तब्लीकी जमाती लोक हिंदू तरुणावर हात उचलतात. ते हिंदूंच्या विरोधात कार्यक्रम घेतात. यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, अशा कार्यक्रमांवर बंदी घालावी आणि याची चौकशी करावी.
आमच्या महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी रोहिंगे नावाची घाण आम्हाला नकोच आहे. आमच्या तलावात घाण साचलेली आहे. ती घाण आम्हाला साफ करायची आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार घाण उखडून टाकणार. त्यांना ठेचल्याशिवाय आपला महाराष्ट्र सुरक्षित राहू शकत नाही. ते ज्या ज्या राज्यात जातात, तेथे ते अस्थिरता निर्माण करतात. बिर्याणी खाणारे यांचे आमच्या सिस्टम मध्ये जे बसले आहेत. त्यांनासुद्धा यावरून शिकण्याची गरज आहे, असा सल्ला मंत्री नितेश राणे यांनी दिला.