Breaking

Nitin Deshmukh : संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यच्या घरावर ट्रॅक्टर मोर्चा

Give a full loan waiver, or else a tractor march on the CM house : शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांचा इशारा

Akola निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या केलेल्या घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करा. अन्यथा ट्रॅक्टर्स मोर्चा काढून मुंबईत थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक देऊ, असा इशारा शिवसेना (ठाकरे) गटाने दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. पीक नुकसाची मदत तातडीने द्या, यासह अन्य मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

खरीप हंगामात कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना फटका बसला. जिल्हयाची पैसेवारीदेखील ४७ पैशाच्या आतच नोंदविली गेली. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रथम नुकसानाचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषद, कृषी व महसूल विभागाकडून संयुक्त पंचनामे करण्यात आले. मात्र अद्यापही मदत जाहीर झालेली नाही.

 

या संदर्भात शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख प्रमुख राहुल कराळे, गोपाल दातकर, मंगेश काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. शेतकऱ्यांना ‘बटेंगे तो कटेंगे’ असे म्हणत शिवसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी बळीराजाला एकसंघ होण्याचे आवाहन केले. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली कंपन्यांना शेतकऱ्यांची जमीन देण्यात येत आहे. निवडणुकीत कर्जमाफिचे आश्वासन देणाऱ्या महायुतीकडून शेतकऱ्यांकडून सक्तिने कर्जवसुली करण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जाऊ, असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला.

भाजपने निवडणुकीच्या वेळी घोषित केलेल्या जाहीरनाम्यानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करा. पीक विम्याचे पैसे तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. मुख्यमंत्री लाकडी बहीण योजनेला अटी-शर्ती लागू करण्यात येऊ नये व सरसकट प्रती माह २१०० रुपये महिला देण्यात यावा. वन्य प्राण्यापासून शेतीला संरक्षण देण्यात यावे. पीक नुकसानाची संपूर्ण मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी तातडीने विद्युत जोडणी देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.