Breaking

Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘चांगला डॉक्टर चांगला माणूसही असावा’!

A good doctor should also be a good person : युवा डॉक्टरांशी संवाद, एम्सचा पहिला दीक्षांत सोहळा

Nagpur वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर म्हणून समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते. पण चांगला माणूस चांगला डॉक्टर असणे आवश्यक आहे. चांगले काम केले की प्रगती आपोआप होते, असा कानमंत्री केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी युवा डॉक्टरांना दिला.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवार, दि. २९ मार्चला नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा AIIMS पहिला दीक्षांत समारोह पार पडला. यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे, खासदार राजेंद्र गोपछडे, आमदार संजय मेश्राम, एम्सचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे, एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

एम्ससारख्या एका प्रतिष्ठित संस्थेतून पदवी पूर्ण केल्यानंतर डॉक्टर म्हणून तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. गरिबांची निःस्वार्थ रुग्णसेवा करा. उपेक्षित भागापर्यंत जास्तीत जास्त अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधा पोहोचविण्यावर भर द्या, असे आवाहनही गडकरींनी केले.

Governor C P Radhakrushnan : नितीन गडकरी म्हणजे भारताचे जॉन एफ केनेडी!

विदर्भाच्या ग्रामीण भागांमधील रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचे आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे काम एम्सच्या माध्यमातून होत आहे. भविष्यात एम्सच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जावी, यादृष्टीने प्रयत्न होतील, असा आशा असल्याचेही ते म्हणाले.

ज्या सुविधा इतर रुग्णालयांमध्ये नाहीत, त्या एम्समध्ये मिळणे अपेक्षित आहे. विशेषतः उत्तर नागपूरसह पूर्व विदर्भात थॅलेसिमिया, सिकलसेलची मोठी समस्या आहे. या उत्तर नागपुरात तर हजारो रुग्ण आहेत. आता एम्समध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट होत आहे, ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे प्रादेशिक समस्या लक्षात घेऊन काम करणे अपेक्षित आहे, असेही गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari : खासदारांची मागणी, गडकरींनी दिला शब्द

दीक्षांत समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. 2018 मध्ये एम्स नागपूरला मिहान येथे सुमारे 200 एकर जमीन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली. गेल्या 6 वर्षांत एम्स नागपूरने आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येत्या काळातही ही संस्था वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.