BJP MahaAdhiveshan in Shirdi : भाजपच्या महाअधिवेशनात दिला जबाबदारीवर भर
Shirdi अनेक लोक आमदार, खासदार, मंत्री होतात. निघून जातात. लोक त्यांना लक्षात ठेवत नाहीत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यातून लोकसभा निवडणूक हरले होते. पण विजयी झालेल्या उमेदवाराचे नाव फार कमी लोकांना माहिती आहे. बाबासाहेब त्यांच्या कामांनी, विचारांनी जगभरात पोहोचले. त्यांची आठवण वारंवार केली जाते. त्यामुळे निवडणुकीच्या जय पराजयातून मोठेपण येत नाही. तर लोकांच्या सेवेतून मोठेपण येतं. आपण जे कार्य करू ते लोकांच्या लक्षात राहणार आहे, या शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘जबाबदारी’वर जोर दिला.
शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन झाले. यावेळी नितीन गडकरी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत विजयाचा आनंद होणं स्वाभाविक आहे. पण महाराष्ट्रात सुराज्य निर्माण करण्याची आपली जबाबदारी आहे. सत्तेत असो अथवा विरोधी पक्षात, जन कल्याणाच्या व्रताचे पालन करू, असा निर्धार आवश्यक आहे. आपण आज सत्तेत आहोत. त्यामुळे शेतकरी, मजुरांचे कल्याण करायचे आहे. सुशासन आणि विकास (Good Governence and Development) ही आपली जबाबदारी आहे. रयतेचं राज्य स्थापन करायचं आहे. न्यायाचं राज्य स्थापन करायचं आहे.’
Panchayat samiti election : उपसभापतीपदासाठी काँग्रेस अर्ज भरणार!
प्रत्येक राजकारणी त्याच्या पुढच्या निवडणुकीचा विचार करतो. पण विकासाची दृष्टी असलेला राजकारणी परिवर्तनाचा विचार करतो, हे कायम लक्षात ठेवण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले. त्यांनी कंगना रनौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा उल्लेख करत जुन्या दिवसांचे उदाहरण दिले.
ते म्हणाले, ‘आणीबाणीमध्ये देशात फार वाईट स्थिती होती. आपल्या लोकांना तुरुंगात टाकण्यात आले. माध्यमांवर, भाषणांवर बंदी होती. अनके कुटुंब उध्वस्त झाले. बिकट परिस्थिती होती. पुढे तर लोकसभेत कमी सदस्य असल्यावरूनही आपली थट्टा होऊ लागली. भाजपला, संघाला भविष्य नाही, असे बोलले जाऊ लागले. पण त्यातूनही आपण उभे झालो. कारण आपण देशकल्याणाचे व्रत हाती घेतले होते.’
तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय?
काँग्रेसची सत्ता गेली एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही. ते गेले आणि आपण आलो, पण परिस्थिती बदलली नाही. तर उपयोग काय? त्यांच्या काळात जे झालं नाही ते आपल्याला करायचं आहे. नाहीतर लोक विचारतील काल काँग्रेस होते आज भाजप आहे. परिस्थिती सारखीच आहे. मग आता तुम्ही येऊन काय उपयोग झाला, असा प्रश्न लोक विचारतील, असंही गडकरी म्हणाले








