Breaking

Nitin Gadkari : टॉयलेट बांधण्यासाठीच परवानगी घेणे बाकी राहिले आहे

Co-operative Societies are not encouraged by the Registrar : रजिस्ट्रारच्या कार्यशैलीवर गडकरींच्या कोट्या

Registrar, Joint Registrar हे वाईट ग्रह आहेत. सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यापेक्षा त्यांचा टायर पंक्चर करण्याचेच काम करतात. त्यांचे पाय ओढण्याचं काम करतात, या शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निबंधकांच्या कार्यपद्धतीवर कामावर बोट ठेवलं. गांधीबाग सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये गडकरी बोलत होते.

रजिस्ट्रार आणि जॉईंट रजिस्ट्रार आपलं काम बरोबर करतात. सरकार कुणाचंही राहिलं तरी त्यांना फरक पडत नाही. त्यांनी सहकारी संस्थांकडे कुठलेही अधिकार ठेवलेले नाहीत. बाथरुम आणि टॉयलेट बांधण्यासाठी रजिस्ट्रारची परवानगी घेणेच आता शिल्लक राहिले आहे. म्हणून हळूहळू सहकारी बँका आता पब्लिक लिमिटेड कंपन्यांमध्ये रुपांतरीत होत आहेत. तरीही सहकारी बँकांचे महत्त्व आपल्याकडे आहे, हे महत्त्वाचं आहे, असंही गडकरी म्हणाले.

‘मी स्वतः काही काळ सहकार चळवळीत काम केले. पण एकदा शेतकरी चळवळीचे नेते शरद जोशी यांनी मला सहकार चळवळीतील नेतृत्वाचे महत्त्व समजावून सांगितले होते. त्यांनी नेतृत्वाची विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची असल्याचे म्हटले होते. एखादी संस्था बुडायला फार वेळ लागत नाही. पण संस्था उभी करण्यासाठी खूप वर्ष लागतात. हे सारं नेतृत्व चांगलं असेल तर सहज शक्य होतं,’ असं गडकरी म्हणाले.

Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा सरकारला घरचा आहेर !

विदर्भात सहकार क्षेत्रात कर्मचारी आणि संचालकांना उत्तम प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. निर्णयक्षमता, टीम वर्क याचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. त्याचा नक्कीच फायदा होतो. महाराष्ट्राची सहकार क्षेत्राची परंपरा मोठी आहे. देशाला दिशा देण्याची क्षमता या परंपरेत आहे, असेही ते म्हणाले.

CM Devendra Fadnavis : देशात फक्त भाजपमध्येच लोकशाही !

पत्नी म्हणाली चिठ्ठी पाठवू नका

‘आमची एक छोटी बँक आहे. बँकेची अध्यक्ष माझी पत्नी आहे. ती सेवासदन शिक्षण संस्थेचीही अध्यक्ष आहे. मी म्हणालो मदत लागली तर मला सांग. तर म्हणाली मला तुमची मदत नको. फक्त शाळेत प्रवेशासाठी कुणाची चिठ्ठी पाठवू नका आणि बँकेतून कुणाला लोन द्यायला सांगू नका, असं माझी पत्नी म्हणाली,’ असं गडकरींनी सांगताच जोरदार हशा पिकला.