Breaking

Nitin Gadkari Devendra Fadnavis गडकरी-फडणविसांनी एकमेकांना दिले श्रेय!

Inauguration of Somalwada-Manishnagar RUB : सोमलवाडा-मनीषनगर रेल्वे अंडरपासचे लोकार्पण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी रात्री सोमलवाडा-मनीष नगर रेल्वे अंडरपास (आरयुबी)चे उद्घाटन झाले. या आरयूबीची नितांत गरज होतीच. याचे श्रेय अर्थातच गडकरी आणि फडणवीस यांना जाते. पण कार्यक्रमात बोलताना स्वतः मुख्यमंत्र्यांनी गडकरींना या कामाचे श्रेय दिले. आणि त्यानंतर गडकरींनीही मुख्यमंत्र्यांमुळे हे काम होऊ शकले, असे म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘नितीनजी गडकरी यांच्यामुळे उत्तम अशा अंडरपासची निर्मिती झाली आहे. मनीष नगर येथे कनेक्टिव्हिटीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून होता. त्यासाठी उड्डाणपूल तयार केला. पण तरीही दुसरी व्यवस्था करण्याची गरज होती. हे काम अत्यंत आव्हानात्मक होते. पण नितीनजींच्या मार्गदर्शनात उत्तम असे काम झाले आहे. दक्षिण-पश्चिम नागपूरच्या जनतेच्या वतीने नितीन गडकरी यांचे आभार मानतो.’

Nitin Deshmukh : संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यच्या घरावर ट्रॅक्टर मोर्चा

गडकरी म्हणाले, ‘आपण एक अंडरपास तयार केला होता. पण त्यातून समस्या सुटली नाही. म्हणून दुसऱ्या प्रकल्पाची योजना आखण्यात आली. मात्र आता नवीन अंडरपाससाठी जागा कोणती ठरवावी, हे काही कळत नव्हते. त्यावेळी नवीन अंडरपाससाठी देवेंद्रजींनी जागेची निवड केली. त्यांनी या जागेचा प्रस्ताव दिला आणि तातडीने कामाला सुरुवात झाली. एवढेच नव्हे तर आता तिसराही उड्डाणपूल देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने मंजूर केला आहे. हा उड्डाणपूल थेट हॉटेल रेडिसनजवळ उतरणार आहे. त्यामुळे भविष्यात मनीषनगर, बेसा, बेलतरोडी येथील नागरिकांची अधिक सोय होणार आहे.’

नागपूर – सोमलवाडा- मनीषनगर रेल्वे अंडरपासमुळे (आरयुबी) वर्धा रोडवर येण्यासाठी आणखी एक कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे. यामुळे मनीषनगर, बेसा, बेलतरोडी येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याठिकाणी रेल्वेचे फाटक होते. पण १७० रेल्वे धावत असल्यामुळे नागरिकांना त्रास व्हायचा. आता नवीन अंडरपासमुळे हा त्रास दूर झाला आहे, असेही गडकरी म्हणाले.

या कार्यक्रमाला राज्यमंत्री आशीष जयस्वाल, आमदार इंद्रनील नाईल, आमदार कृपाल तुमाने, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, अविनाश ठाकरे, रितेश गावंडे यांची उपस्थिती होती.

High Court Decision : सार्वजनिक कामाचे बिल अडविणे भोवले

पावसाळ्यात पाणी साचणार नाही
३३.८३ कोटी रुपयांचा हा प्रकल्प मनीष नगर, बेसा, बेलतरोडी येथील नागरिकांसाठी अत्यंत सोयीचा ठरला आहे. पावसाळ्यात पाणी साचायला नको यासाठी उच्चक्षमतेचे पंप बसविण्यात आले आहेत. १९० मीटरच्या या अंडरपासमध्ये पादचाऱ्यांसाठी देखील फुटपाथची सोय करण्यात आली आहे.