Breaking

Nitin Gadkari Devendra Fadnavis : गडकरी, फडणविसांचे कॉलेज झाले शंभरीचे!

Centenary Celebration of Dr. Babasaheb Ambedkar College of Law : माजी उपराष्ट्रपती, माजी पंतप्रधानांनी घेतले कायद्याचे शिक्षण

Nagpur माजी उपराष्ट्रपती, माजी पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, दोन सरन्यायाधीश व अनेक मोठे नामांकित विधिज्ञ घडविणाऱ्या नागपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाने शंभरी गाठली आहे. या महाविद्यालयातून अनेक यशस्वी राजकारणीदेखील निघाले आहेत. त्यात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचादेखील समावेश आहे.

मंगळवार, २८ जानेवारीला या महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाला सुरुवात होत आहे. महोत्सवाचे उद्घाटन नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस, सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. गडकरी व फडणवीस हे त्यांच्या भाषणात अनेकदा कायदेशीर नियमांचा हवाला देतात. आपल्यावर कायद्याचे संस्कार याच महाविद्यालयात झाले आहेत, असं ही मंडळी नेहमी सांगत असतात. त्यामुळे शताब्दी महोत्सवात त्यांच्या भाषणात कोणते मुद्दे येणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

Nagpur Police : नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विधि महाविद्यालयाची स्थापना सन १९२५ मध्ये झाली. भारतात स्थापन झालेले हे १० वे स्वतंत्र लॉ कॉलेज होते. देशाचे माजी पंतप्रधान नरसिंह राव, उपराष्ट्रपती मो. हिदायतुल्ला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. विद्यार्थी चळवळींमध्ये या महाविद्यालयाने मौलिक भूमिका पार पाडली.

यासोबत देश पातळीवर नागपूरची मान उंचावणारे अनेक दिग्गज विधीज्ञ देखील या महाविद्यालयाने घडवले आहेत. त्यात सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. रुमा पॉल, न्या. विकास सिरपूरकर, न्या. वासंती वाईक, न्या. आर. के. देशपांडे, माजी महाधिवक्ता व्ही. आर. मनोहर, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे माजी अध्यक्ष ॲड. शशांक मनोहर, ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांचा आवर्जून समावेश होतो.

Vidarbha farmers : शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली तूर

विधि महाविद्यालयाच्या आवारात राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत समाविष्ट असलेल्या मूल्यांचे चित्रण करणाऱ्या थीमवर आधारित संविधान उद्यान उभारले जात आहे. सध्याच्या शैक्षणिक सत्रात, संपूर्ण देशात अशा प्रकारचे हे एकमेव उद्यान आहे, असल्याचे महाविद्यालय व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.